Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लॉकडाऊन कालावधीत राज्यात आतापर्यंत ८३ हजार गुन्हे दाखल

Webdunia
गुरूवार, 30 एप्रिल 2020 (10:13 IST)
कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ६९ हजार गुन्हे दाखल
लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २८ एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ८३,१५६  गुन्हे दाखल झाले असून १६,८९७ व्यक्तींना अटक करण्यात आली. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ९४ लाख ६६ हजार ६९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती पोलीस विभागाच्या प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.

उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ८०, ६१७ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा ६१८ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १११४ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.व ४९,८०२ वाहने जप्त करण्यात आली.

परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.
पोलिसांवर हल्ला प्रकरणे
या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १६५ घटनांची नोंद झाली असून यात ६१८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने २१ पोलीस अधिकारी व १३४ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ५ पोलीस अधिकारी व ६ कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून उरलेल्या १६ पोलीस अधिकारी व १२५ पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments