Marathi Biodata Maker

नगर जिल्ह्यात ओमिक्रोनचा आणखी एक रुग्ण आढळला

Webdunia
शनिवार, 25 डिसेंबर 2021 (08:19 IST)
अहमदनगर जिल्ह्यातील ओमायक्रॉन रुग्णसंख्येत आता वाढ झाली आहे, जिल्ह्यात एकाच दिवशी एकूण दोन रुग्ण आढळले आहेत. आईसोबतच सहा वर्षांच्या मुलालाही बाधा झाल्याचे निष्पन्न आहे.
नायजेरियातून श्रीरामपूरला परतल्यानंतर झालेल्या तपासणीत संसर्ग आढळून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ही महिला व तिचा मुलगा नायजेरिया येथून आले होते.
तेव्हाच आरोग्य विभागातर्फे या दोघांचेही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्या दोघांचे अहवाल आले, महिलेवर श्रीरामपूरमधीलच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, जगभरात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर, आता नगर जिल्ह्यात रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.ज्या टॅक्सीमधून ते आले होते, त्या चालकासह त्यांच्या संपर्कात आलेल्या दहा जणांची तपासणी करण्यात आली होती. या सर्वांचे करोना चाचणीचे अहवाल मात्र निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

नांदेडमध्ये ४३ लाखांहून अधिक किमतीची ४,७९६ घातक शस्त्रे जप्त

LIVE: वाशिमचे माजी शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांचा भाजपमध्ये प्रवेश

पाकिस्तानमधील क्वेट्टा येथे रेल्वे रुळाजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात २६ जण ठार

IPL 2026: प्लेऑफसाठी पात्र ठरणारा चौथा संघ आज निश्चित होणार; मुंबईचा सामना राजस्थानशी, तर केकेआरचा सामना दिल्लीशी होणार

ट्विशा शर्मा प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार; एम्सचे पथक भोपाळमध्ये दाखल, पुन्हा शवविच्छेदन केले जाणार

पुढील लेख