Marathi Biodata Maker

विमानतळावर कोरोना नियम मोडणे प्रवाश्यांना धक्कादायक ठरेल: डीजीसीए

Webdunia
मंगळवार, 30 मार्च 2021 (18:09 IST)
अलीकडील काळात देशात कोरोनाविषाणूंच्या नवीन घटनांमध्ये मोठी झेप झाली आहे.यामुळे, नवीन निर्बंधांचा कालावधी देखील सुरू झाला आहे. विमानतळावर मास्क लावणे ,सामाजिक अंतर राखणे सारखे अनेक प्रोटोकॉल चेही अनुसरण केले जात आहे. या दरम्यान डीजीसीए ने एक निवेदन जारी केले असून या मुळे हवाई प्रवाश्यांना मोठा धक्का बसू शकतो.  
डीजीसीएने म्हटले आहे की कोरोना नियमांचे उल्लंघन करत विमानतळांवर कोणीही आढळले तर त्यावर त्यात क्षणी दंड आकारण्यात येईल. 
डीजीसीएने म्हटले आहे की देशातील अनेक विमानतळांवर कोविड प्रोटोकॉलचे पूर्ण पालन केले जात नाही. डीजीसीएने एअरलाइन्सला विमानतळांवर फेस मास्क घालणे आणि विमानतळांवर सामाजिक अंतर राखणे यासारख्या नियमांचे पालन केले पाहिजे याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
“स्पॉट फाईनसह कोरोना प्रोटोकॉलचे पालन न करणाऱ्याच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचेही पर्याय आहेत.गेल्या आठवड्यात डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे की गेल्या आठवड्यात तीन एयरलाईन्समध्ये 15 प्रवासी कोरोनाच्या नियमांना मोडताना आढळले होते. त्याच्या वर तीन आठवडे उड्डाण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
त्याच बरोबर हेसुद्धा यापूर्वी सूचना देण्यात आले होते की ज्या प्रवाश्यांने योग्य प्रकारे मास्क लावले नाही त्यांच्या विरुद्ध नियमांचे उल्लंघन करण्यासाठी कारवाई करून त्यांना उड्डाणातून काढण्यात यावे. डीजीसीए ने विमान कंपन्यांना तीन महिन्यापासून ते दोन वर्षा पर्यंतचे निर्बंध आणण्यास परवानगी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

अखिलेश यादव यांच्या भावाचे दुःखद निधन

LIVE: बारामतीमध्ये रेड बर्ड एव्हिएशनचे प्रशिक्षण विमान कोसळले

मुंडवा जमीन व्यवहार: पार्थ पवार यांच्या कंपनीला धक्का, २१ कोटी रुपयांचा दंड कायम

बारामतीमध्ये विमान अपघात, रेड बर्ड एव्हिएशनचे प्रशिक्षण विमान कोसळले

Nashik TCS case: मुख्य आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या संभाजीनगरमधील एआयएमआयएम नेत्याच्या बेकायदेशीर बांधकावर बुलडोझर चालला

पुढील लेख