Festival Posters

‘मातोश्री’ बाहेरील सुरक्षा रक्षकाला कोरोना

Webdunia
शनिवार, 2 मे 2020 (16:16 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थाना बाहेरील सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी एका पोलीस कर्मचाऱ्याला कलिना विद्यापिठात क्वॉरंटाईन करण्यात आले असून उर्वरित दोन जणांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थाना बाहेर पोलीस तैनात करण्यात आले होते. मातोश्री बाहेरील गेटवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत तीन पोलिस कर्मचाऱ्याचे कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आला. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांना देखील क्वॉरंटाईन करण्यात आले असून त्यांची देखील चाचणी करण्यात येणार आहे. सध्या पॉझिटिव्ह असलेले पोलिस कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
 
यापूर्वी मातोश्री निवासस्थानापासून अगदी जवळ असणाऱ्या एका चहावाल्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

इंडिगोची मोठी घोषणा; रद्द केलेल्या विमानांच्या संपूर्ण परतफेडीची रक्कम परत केली जाईल

इंडिगो विमानसेवा रद्द झाल्याने गोंधळ; रेल्वेने जबाबदारी घेत ३७ गाड्यांमध्ये ११६ नवीन कोच जोडले

गुंडांसाठी चांगले दिवस आले; वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले

परदेशात नोकरी देण्याच्या फसवणुकीचा मुंबईत पर्दाफाश, मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त

LIVE: उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार

पुढील लेख
Show comments