Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

१२१६ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १७ हजार ९७४ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Webdunia
शुक्रवार, 8 मे 2020 (08:58 IST)
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १७ हजार ९७४ झाली आहे. १२१६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात २०७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३०१ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ०२ हजार १०५ नमुन्यांपैकी १ लाख ८३ हजार ८८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर १७ हजार ९७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख १२ हजार ७४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ४९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यातील विविध रुग्णालयात भरती असलेल्या ८८१६ रुग्णांचे त्यांच्या लक्षणाच्या तीव्रतेनुसार विश्लेषण केले असता पुढील निष्कर्ष समोर आले आहेत –
 
या एकूण भरती रुग्णांपैकी ५२२८ ( ५९ टक्के) रुग्ण हे लक्षणे विरहित आहेत.
३२०९ (३६ टक्के) रुग्ण हे सौम्य ते मध्यम लक्षणे असणारे आहेत. तर
४२४ (५ टक्के) रुग्ण हे गंभीर स्वरुपाचे असून त्यातील २३६ (३ टक्के) रुग्ण ऑक्सिजनची आवश्यकता असणारे आहेत तर ९२ (१ टक्के) रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता लागलेली आहे. उर्वरित ९६ रुग्ण इतर कारणांमुळे अतिदक्षता विभागात भरती आहेत.
 
आज राज्यात ४३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ६९४ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील २४, पुण्यातील ७, वसई विरार मध्ये ५, सोलापूर शहरात २, अकोला शहरात १, पालघरमध्ये १ आणि  औरंगाबाद शहरात १ मृत्यू झाला आहे.  याशिवाय मणिपूरमधील १ आणि बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.
 
आज झालेल्या मृत्यूंपैकी २४ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ४३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २५ रुग्ण आहेत तर १४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. ४३ रुग्णांपैकी २९ जणांमध्ये (६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६९४ झाली आहे. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments