rashifal-2026

राज्यात ८ जानेवारीला सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा ड्राय रन

Webdunia
मंगळवार, 5 जानेवारी 2021 (16:11 IST)
राज्यात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे सध्या आठ रुग्ण असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. नव्या प्रकाराची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांपैकी कोणी पॉझिटिव्ह नसल्याची दिलासादायक माहितीही यावेळी त्यांनी दिली. आयसीएमआरच्या प्रोटोकॉलचं आपण सक्तीने पालन करत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात ८ जानेवारीला सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची ड्राय रन होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
 
राजेश टोपे यांनी यावेळी जनतेने जागरुक राहावं, घाबरण्याचं कारण नाही. चिंता करु नका पण काळजी घ्या असं आवाहन केलं. “व्हायरसचा हा नवा प्रकार जास्त संसर्गजन्य आहे. ७० टक्के अधिक झपाट्याने संसर्ग होऊ शकतो. काळजी घ्यावी, सजग राहावं इतकंच महत्वाचं आहे,” असं त्यांनी सांगितलं.
 
“७ जानेवारीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत आमची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग होणार असून अनेक मुद्दे मांडणार आहेत. ज्या त्रुटी वाटत आहेत त्याबद्दल देखील सांगणार आहोत. ८ तारखेला प्रत्येक जिल्ह्यात ड्राय रन करणार असून त्याच्यातून आपली यंत्रणा तपासली जाईल. यामध्ये काही त्रुटी वैगेरे आहेत का? पोलीस, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्यात समन्वय आहे का? याचीही पाहणी होईल. ज्यावेळी आपण लसीकरणाचा कार्यक्रम राबवू त्यावेळी कोणतीही अडचण न येता कार्यक्रम राबवता यावा यादृष्टीने हे सर्व करणार आहोत,” अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दररोज किती अगरबत्ती लावाव्यात? धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे जाणून घ्या

आपल्या मुलांना धार्मिक आणि नैतिक मूल्ये कशी शिकवाल?

तुळशीजवळ ही ५ झाडे लावणे अशुभ !

मेकअप किट शेअर करू नका, त्वचेच्या या समस्या उद्भवू शकतात

तुमचे बोलणे प्रभावी करा: संवाद कौशल्यातील (Communication Skills) गुप्त गोष्टी जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील 131 बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या पदांसाठी आरक्षण प्रक्रिया सुरू

LIVE: वणीमध्ये ठाकरे बंधूंच्या एकतेची झलक; एकत्र महापालिका निवडणुका लढवणार

छत्रपती संभाजीनगरात 300 कोटींची वीज थकबाकी, वीज तोडणी मोहीम तीव्र

दिल्ली बॉम्बस्फोटात पुलवामा डॉक्टर उमर संशयित, डीएनए चाचणीमुळे गुपित उघड होईल

तामिळनाडूत गॅस सिलिंडर वाहून नेणारा ट्रक उलटला

पुढील लेख