Marathi Biodata Maker

भारतात निर्मित होणाऱ्या लसीबाबत आशादायी : टोपे

Webdunia
शनिवार, 4 जुलै 2020 (08:56 IST)
कोरोना प्रतिबंधासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) व भारत बायोटेक इंटरनॅशनल लि. (बीबीआयएल) यांच्या एकत्रित प्रयत्नातून पहिली भारतीय लस तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये यश मिळाल्यावर भारतात निर्मित होणाऱ्या या लसीबाबत आशादायी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  येथे सांगितले.
 
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले यासंदर्भात आयसीएमआरचे संचालक डॉ. भार्गव यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारपणे महत्त्वाच्या १३ ते १४ हॉस्पिटल्समध्ये या लसीबाबत क्लिनीकल ट्रायल्स करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ७ जुलै पर्यंत ह्या क्लिनीकल ट्रायल्स व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. साधारणपणे १५ ऑगस्टपर्यंत प्री-क्लिनीकल आणि क्लिनिकल ट्रायलचे काम पूर्ण होऊन पहिली भारतीय बनावटीची लस तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे डॉ.भार्गव यांनी सांगितल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. याबाबत मी आशादायी असून सर्व बाबी वेळेत पूर्ण झाल्यास आपल्या देशाची पहिली लस आयसीएमआर-बीबीआयएल यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार होऊ शकेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

मुंबईतील मानखुर्द येथे नवीन कारागृह बांधण्यात येणार, कारागृह प्रशासनाला ११ एकर जमीन मिळाली

धुळे जिल्ह्यातील शिरपूर मध्ये पत्नी समोर अपमान केल्याने, मुलाने केली आई वडिलांची निर्घृण हत्या

LIVE: मुंबईतील मानखुर्द येथे नवीन कारागृह बांधण्यात येणार

मुंबईत मराठी फलकांचा वाद चिघळला, बीएमसीकडून छोट्या व्यापाऱ्यांवर कारवाई

फडणवीस सरकारकडून महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल, ५२ आयपीएस,पोलीस दलातील ४४ अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुढील लेख
Show comments