Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निपाह विषाणू मानवापर्यंत कसा पोहोचला? केरळमधील बाधित मुलाच्या संपर्कात आलेल्या शेळीचे नमुने घेतले

Webdunia
सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (18:07 IST)
केरळमध्ये कोरोना विषाणूच्या धोक्यात, आता निपाह व्हायरसने चिंता वाढवली आहे. केरळच्या कोझीकोडमध्ये निपाह विषाणूमुळे 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागाची टीम या विषाणूच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी जमली आहे. सोमवारी केरळ पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक केके बेबी यांनी सांगितले की आम्ही एका शेळीचे नमुने गोळा केले आहेत. जो मुलांच्या संपर्कात आला. एका रामबुटानच्या झाडाची देखील तपासणी करण्यात आली, कारण त्यात फळे होती जी कदाचित वटवाघळांनी चावली असतील.
 
कोझिकोडमध्ये एका मुलाच्या मृत्यूनंतर दोन आरोग्य कर्मचाऱ्यांनाही विषाणूची लागण झाल्याचे कळले आहे. केंद्राच्या आरोग्य पथकाने रविवारी केरळच्या कोझिकोड जिल्ह्याला भेट दिली आणि परिसरातून रामबुटान फळांचे नमुने गोळा केले. सरकारच्या निवेदनानुसार, हे नमुने व्हायरसच्या उत्पत्तीविषयी माहिती गोळा करण्यात मदत करू शकतात.
 
नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल टीम तपासात गुंतली आहे
दिल्लीच्या नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या टीमने कुटुंब आणि मुलाच्या जवळच्या लोकांशी संवाद साधला आणि त्याने खाल्लेले अन्न आणि त्याच्या संपर्कात आलेले प्राणी ओळखले. मुलाचे किमान 18 जवळचे लोक, प्रामुख्याने नातेवाईक आणि आरोग्य कर्मचारी आणि 150 दुय्यम संपर्क ओळखून त्यांना क्वारंटाइन केले आहे. नंतर दोन आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये  निपाहचे लक्षणे दिसली.
 
2018 मध्ये निपाह व्हायरस देखील सापडला
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) नुसार 2018 मध्ये केरळमधील कोझीकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यांमध्ये निपाह व्हायरसचा प्रादुर्भाव नोंदवला गेला. निपाह विषाणू रोग फळांच्या वटवाघळांमुळे होतो आणि मानवांबरोबरच प्राण्यांसाठीही घातक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

रशियाने आणखी एका अमेरिकन व्यक्तीला ताब्यात घेतले ड्रग्जची तस्करी करण्याचा आरोप

LIVE: महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढणार

मुंबईत सायबर गुन्हेगारांनी 39 वर्षीय व्यक्तीच्या बँक खात्यातून 1.55 लाख रुपये काढले

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवाहन केले

मुंबईत कौटुंबिक वादातून वडिलांनी केली 4 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments