Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात १५ ते २० टक्के चाचण्यांमध्ये नवे व्हेरियंट आढळतो

Webdunia
बुधवार, 24 मार्च 2021 (22:15 IST)
महाराष्ट्रातही कोरोनाचे नवे व्हेरियंट अर्थात  स्ट्रेन आढळत आहेत. महाराष्ट्रात तपासण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये डिसेंबर २०२० च्या तुलनेत E484Q आणि L452F व्हेरियंट आढळले आहे. हे व्हेरियंटमुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असून संक्रमित रुग्णांची संख्या पून्हा वाढत आहे. १५ ते २० टक्के चाचण्यांमध्ये नवे व्हेरियंट आढळत आहे. महाराष्ट्रासह केरळमध्येही कोरोनाचे नवे व्हेरियंट आढळत आहेत. केरळमधील १४ जिल्ह्यामधील २०३२ कोरोना पॉझिटिव्ह चाचण्यांमध्ये N440K हा कोरोनाचा नवा व्हेरियंट सापडला आहे. तर आंध्रप्रदेशातील ३३ टक्के चाचण्यांमध्ये N440K हा व्हेरियंट सापडला आहे. तर तेलंगणामध्येही ५३ टक्के चाचण्यांमध्ये हा व्हेरियंट मिळाला आहे.
त्याचप्रमाणे युके, सिंगापूर, जपान, ऑस्ट्रेलियासग १६ विविध देशांमध्येही कोरोनाचा हा नवा व्हेरियंट सापडत आहे. देशात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या २४ तासांत सर्वाधित म्हणजे ४७ हजार कोरोना केसेस समोर आल्या आहेत. यातील ५० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे या नव्या व्हेरियंटमुळे कोरोना रुग्ण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

चिंचवड विधानसभेच्या जागेवर भाजप कडूनआमदार अश्विनी जगताप यांना उमेदवारी

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी NIA कोर्टातून साध्वी प्रज्ञा ठाकूरला जामीन वॉरंट

शिवाजीनगर जागेवर भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधी यांच्या दौऱ्यावर टीका

Bandipora : दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार

पुढील लेख
Show comments