Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्लॅक फंगस आजाराच्या उपचारासाठी दर ठरले

ब्लॅक फंगस आजाराच्या उपचारासाठी दर ठरले
, शुक्रवार, 4 जून 2021 (18:37 IST)
राज्यात म्युकरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगसच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येला बघता.या आजारावरील उपचार सामान्य माणसाला आर्थिक दृष्टया परवडणारा नाही हे बघून या आजारासाठी खासगी रुग्णालयात या आजाराच्या उपचारासाठी दर निश्चित करण्यात आले आहेत.
 
आरोग्य विभागाच्या या अधिसूचनेला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली असून दर शहराचे वर्गीकरण करून दर निश्चित करण्यात आले आहे. ठरलेल्या दरांपेक्षा अधिक दर आकारण्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल. 
 
राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहिर केला होता. त्यानुसार महात्मा फुले जनआरोग्य आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयातून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. 
 
त्यानंतर खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिस आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्यमंत्री टोपे यांनी उपचाराबाबात खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे आता ही अधिसूचना 31जुलै2021  पर्यंत राज्यभरात लागू असल्याचे सांगण्यात आले.
 
दराची आकारणी या प्रमाणे असेल-
 अ वर्ग शहरांसाठी 4 हजार रूपये, ब वर्ग शहरांसाठी 3 हजार रूपये आणि क वर्ग शहरांसाठी 2400 रूपये दर निश्चित करण्यात आला असून त्यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या,औषधं, बेड्सचा खर्च व जेवण यांचा समावेश आहे. मोठ्या चाचण्या व तापसणी तसेच उच्च पातळीवरची मोठी औषधं यातून वगळण्यात आली आहेत.
व्हेंटिलेटरशिवाय आयसीयू व विलगीकरण : अ वर्ग शहरांसाठी 7500 रूपये, ब वर्ग शहरांसाठी 5500 आणि क वर्ग शहरांसाठी 4500 रूपये असेल.

अ वर्ग शहरांमध्ये मुंबई तसेच महानगर क्षेत्र (मीरा भाईंदर मनपा, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर मनपा क्षेत्र, अंबरनाथ, कुळगाव बदलापूर, पनवेल महापालिका) पुणे तसेच, पुणे महानगर क्षेत्र नागपूर, नागपूर मनपा, दिगडोह, वाडी यांचा समावेश आहे.

ब वर्ग शहरांमध्ये नाशिक, अमरावती, औरंगाबाद, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली यांच्यासह जिल्हा मुख्यालयं यांचा समावेश आहे.

क वर्ग गटात अ आणि ब गटाव्यतिरिक्त इतर शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

म्युकरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगस या आजारात शस्त्रक्रिया या उपचारांतील महत्त्वाचा घटक लक्षात घेऊन राज्य शासनाने 28 प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठीचा खर्च निश्चित केला असून अ वर्ग शहरांमध्ये त्यासाठी 1 लाख रूपयांपासून ते 10 हजार रूपये, ब वर्ग शहरांसाठी 75 हजार रूपयांपासून 7500 रूपयांपर्यंत आणि क वर्ग शहरांसाठी 60 हजार रूपयांपासून ते 6 हजार रूपयांपर्यंत दर ठरविले   आहेत. या दरांमुळे साधारण माणसाला दिलासा मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा जप्त केला