Marathi Biodata Maker

राज्यात 9,855 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Webdunia
शुक्रवार, 5 मार्च 2021 (07:53 IST)
राज्यात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागल्याचे दिसून येत आहे. राज्यात गुरुवारी 9 हजार 855 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर, 42 रुग्णांचा मृत्यू झाला.
 
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 21 लाख 79 हजार 185 एवढी झाली आहे. त्यापैकी 20 लाख 43 हजार 349 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 6 हजार 559 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.77 टक्के झाले आहे.
 
सध्या राज्यात एकूण 82 हजार 343 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात 42 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात  52 हजार 280 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.40 टक्के एवढा आहे. राज्यात 3 लाख 60 हजार 500 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 701 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
 
पुण्यात सर्वाधिक 16 हजार 491सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याखालोखाल नागपूर मध्ये 10 हजार 132, मुंबई 8 हजार 594 तर, ठाण्यात 8 हजार 810 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

नवी मुंबईत महायुतीला धक्का, भाजप आणि शिवसेना आमनेसामने

विश्वविजेता गुकेश 12 वर्षांच्या खेळाडू सर्गेई स्लॉटकिन कडून पराभूत

दिग्गज क्रिकेटर डग ब्रेसवेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

प्रसिद्ध क्रिकेटपटू ह्यू मॉरिस यांचे कॅन्सरमुळे निधन

LIVE: संभाजीनगरात भाजप-शिवसेना युती तुटली

पुढील लेख
Show comments