suvichar

दुकांनाच्या वेळ तसेच विकेंडलाही दिलासा मिळण्याची शक्यता

Webdunia
गुरूवार, 29 जुलै 2021 (23:01 IST)
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पार पडली आहे.  राज्यातील दुकांनाच्या वेळेत बदल होऊ शकतात. तसेच विकेंडलाही दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत.
 
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला सूचित केले आहे की, निर्बंध शिथिल करण्याबाबत सर्वांचे अभिप्राय, मत द्यावी. ते अभिप्राय विचारात घेऊन टास्क फोर्सच्या मदतीने अंतिम निर्णय घेतला जाईल. आरोग्य विभागाकडून असे मत मांडण्यात आले आहे की, राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी ११ जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे. तसेच दैनंदिन रुग्णवाढीचा दर देखील या ठिकाणी वाढत आहे. या ११ जिल्ह्यांमध्ये पूर्ण पश्चिम महाराष्ट्रासह कोकणचा भाग, मराठवाड्यातील बीड, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरचा समावेश आहे. हे जिल्हे सोडले, तर उर्वरित जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटर रेट ०.१, ०.३., ०.४ अशा स्वरुपाने आहे. त्या ठिकाणी दररोज ५ ते १० केसेस आढळत आहे. अशा जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करावेत असे आमचे मत आहे.’
 
पुढे टोपे म्हणाले की, ‘राज्यात शनिवार, रविवार दुकाने पूर्णपणे बंद होती. त्यात बदल करून शनिवारी दुकाने ३ ते ४ वाजेपर्यंत चालू ठेवता येऊ शकतात. तसेच आठवड्याला (सोमवार ते शुक्रवार) दुकाने ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती त्यात वाढ करून ९ वाजेपर्यंत सुरू करता येऊ शकतात. रेस्टॉरंट, चित्रपटगृह, सलून, जिम हे ५० टक्के सुरू करता येईल. पण अशा ठिकाणी एसी नको, खेळती हवा असली पाहिजे. तसेच खासगी ऑफिस ५० टक्के सुरू करायला पाहिजे. रेस्टॉरंटमध्ये दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्यास काही हरकत नाही.’
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

शेअर बाजारात विक्रमी वाढ, सेन्सेक्सने ८३,००० चा टप्पा ओलांडला, निफ्टीमध्येही वाढ

अमरावतीत मजुरांनी भरलेले वाहन 50फूट खोल दरीत कोसळले, पाच जण जागीच ठार

Nepal Bus Accident: नेपाळमध्ये प्रवासी बस नदीत कोसळल्याने 18 जणांचा मृत्यू

दक्षिण चीन समुद्रात 7.1 तीव्रतेचा भूकंप

LIVE: महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू

पुढील लेख
Show comments