Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोवॅक्सीन लसींसाठी एम्स मध्ये मुलांच्या चाचण्या सुरु

कोवॅक्सीन लसींसाठी एम्स मध्ये मुलांच्या चाचण्या सुरु
, सोमवार, 7 जून 2021 (23:08 IST)
नवी दिल्ली. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) ने मुलांमध्ये कोरोनव्हायरस संसर्गाविरूद्ध स्वदेशी निर्मित लसीची चाचणी घेण्यासाठी सोमवारपासून एका 2 वर्षा ते 18 वर्षाच्या मुलाची चाचणी सुरू केली.
भारत बायोटेक लस मुलांसाठी सुरक्षित आहेत की नाही हे शोधण्यासाठी मुलांची पटना मध्ये असलेले एम्स मध्ये ही चाचणी सुरु करण्यात आली आहे.चाचणी अहवाल आल्यानंतरच मुलांना लस दिली जाईल. 
 
ही चाचणी 525 निरोगी मुलांवर केली जाईल ज्या अंतर्गत मुलांना लसचे  2 डोस दिले जातील. यापैकी दुसरा डोस पहिल्या डोसनंतर 28 व्या दिवशी दिला जाईल.
 
एम्सचे सेंटर फॉर कम्युनिटी मेडिसीनचे प्रोफेसर डॉ संजय राय म्हणाले की, मुलांना लसीची तपासणी करण्यास सुरुवात केली गेली आहे आणि चाचणी अहवाल आल्यानंतरच मुलांना लसीचा एक डोस दिला जाईल. भारताच्या औषध नियामकानं 12 मे रोजी दोन ते 18 वर्षे वयोगटातील तरुणवयीन मुलांवर चाचणी करण्यास मान्यता दिली होती.सध्या देशातील लसीकरण मोहिमेत प्रौढ लोकांना कोवॅक्सीनची लस दिली जात आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यातील सेनेटाईझर कंपनीत भीषण अग्निकांड 18 मृतदेह बाहेर काढले गेले