Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाप्परे, न्यूयॉर्कमध्ये दोन मांजरांना कोरोनाची लागण

बाप्परे, न्यूयॉर्कमध्ये दोन मांजरांना कोरोनाची लागण
, गुरूवार, 23 एप्रिल 2020 (16:48 IST)
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये दोन मांजरांना कोव्हिड-१९ आजाराला कराणीभूत ठरणाऱ्या सार्स COV-2 विषाणूंची लागण झाली आहे. अमेरिकेत पाळीव जनावरांमध्ये हा विषाणू पहिल्यांदाच आढळून आला आहे.
 
या मांजरी न्यूयॉर्क राज्यातील वेगवेगळ्या भागातील असून दोघांना श्वसनाच्या आजारामुळे त्यांना पशुवैद्याकडे नेण्यात आले. पहिली मांजर ज्या घरातून आली त्या रहिवाशांपैकी कोणातही कोरोनाची लक्षणे नव्हती तर दुसऱ्या मांजरीच्या घरातील मालकामध्ये मात्र कोरोची लक्षणे आढळून आली आहेत.
 
न्यूयॉर्कमधील दोन मांजरींना कोरोनाव्हायरस या कोविड-१९ची लागण झाल्याची माहिती फेडरलच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. दोघांनाही श्वसनाच्या सौम्य लक्षणे होती. ही दोन्ही मांजर आता उपचारानंतर रिकव्हर होत आहेत.
 
 दरम्यान, या दोन्ही मांजरींना श्वसनाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांची चाचणी केली गेली आणि त्यांना न्यूयॉर्कच्या प्राणिसंग्रहालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष गाड्या सोडा