Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

World Cup 2019: ब्लॅकमध्ये विक्री होत आहे भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकिट, किंमत ऐकून तुम्ही व्हाल हैराण

Webdunia
शनिवार, 15 जून 2019 (12:17 IST)
या रोमांचक सामन्याला बघण्यासाठी आणि त्याचा साक्षीदार बनण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी तयारी केली आहे. भारत-पाकिस्तान सामन्याचा रोमांचच असा आहे की या सामन्याचे तिकिट 50-60000 रुपयांमध्ये विक्री होत आहे.   
 
हो, हे खरं आहे, भारत-पाक सामन्याच्या तिकिटांची किंमत आता 60 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. वर्ष 2013 नंतर दोन्ही देशांमध्ये दुरावा निर्माण झाल्यामुळे भारत आणि   पाकिस्तान संघ फक्त आयसीसी आणि आशियाई क्रिकेट काउंसिल द्वारे आयोजित करण्यात येणार्‍या टूर्नामेंटमध्येच अमोर समोर येतात.  
 
एवढ्या दिवसाने होणार्‍या सामन्यामुळे यंदा देखील प्रेक्षकांचा रोमांच आणि उत्साह वाढलेला आहे आणि म्हणूनच 26 हजार क्षमता असणारा ओल्ड ट्रैफर्ड स्टेडियममध्ये होणार्‍या या सामन्याचे तिकिट विंडो ओपन झाल्याबरोबरच काही तासांमध्ये विकण्यात आले.
 
ब्रिटनमध्ये लाखोच्या संख्येत भारतीय आणि पाकिस्तानी मूळचे लोक राहतात म्हणून तिकिट महाग होण्याचे हे देखील एक कारण आहे.  
 
पण ज्या लोकांनी अगोदरच तिकिट खरेदी केले होते, ते लोक आता तेच तिकिट विकून फायदा मिळवत आहे. असेच लोकांकडून तिकिट घेऊन परत त्याची विक्री करणारी वेबसाइट 'वियागोगो'ने दिलेल्या वृत्तानुसार त्याच्या जवळ किमान 480 तिकिट परत विक्रीसाठी आले आहे ज्यात ब्राँझ, गोल्ड, प्लॅटिनम आणि सिल्वर स्तराचे तिकिट होते.   
कंपनीच्या वेबसाइट अनुसार ब्राँझ आणि सिल्वर स्तराचे तिकिट त्याने पूर्ण विक्री केले आहे ज्याची किंमत 17 हजार रुपयांपासून तर 27 हजार रुपयांपर्यंत होती.  
 
तसेच शुक्रवारापर्यंत 58 गोल्ड आणि 51 प्लॅटिनम स्तराचे तिकिट उपलब्ध होते, ज्याची किंमत 47 हजार रुपयांपासून 62 हजार रुपयांपर्यंत ठेवण्यात आली होती. वेबसाइट नुसार त्याच्याजवळ गोल्ड स्तराचे 58 आणि प्लॅटिनम स्तराचे 51 टिकत अजूनही उपलब्ध आहे. वेबसाइटनुसार ब्राँझ आणि सिल्वर स्तराच्या तिकिटांच्या किंमतींत 5 हजार रुपयांचे अंतर आहे कारण त्या क्षेत्रात दारूसाठी स्वीकृती आहे, त्याचीच अधिक डिमांड आहे.  
 
रिपोर्टनुसार शुक्रवारी गोल्ड स्तराचे तिकिट किमान 4.20 लाख रुपये (6 हजार डॉलर)मध्ये विकण्यात आले.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

GG W vs UPW W: गुजरातने UP ला सहा गड़ी राखून पहिला विजय मिळवला

IPL Schedule 2025: आयपीएलच्या 18 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर,कोलकाता आणि आरसीबी यांच्यात पहिला सामना

MI W vs DC W : दिल्ली कॅपिटल्सने रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा दोन विकेट्सने पराभव केला

सचिन तेंडुलकर या लीगमध्ये भारताचे नेतृत्व करतील, इतके संघ सहभागी होतील

महिला प्रीमियर लीग आजपासून सुरू, पाच संघांमध्ये जेतेपदाची लढाई,एकूण 22 सामने खेळले जातील

पुढील लेख
Show comments