षड्रिपुविवेचन – कामनिरूपण भल्यासी वैर करिती ते साही ओळखा बरें । षड्रिपु कामक्रोधादि मदमत्सर दंभ तो ॥१॥ प्रपंच साहवा वैरी तयांना जिंकितां बरें । भल्यासी लविती वेडा परत्र मार्ग रोविला ॥२॥ काम आरंभिंचा वैरी निष्काम बुडवी सदा । कामना लागली पाठी काम काम करी जनीं ॥३॥ काम उत्पन्न होताहे...