Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री सप्‍तशती गुरुचरित्र - अध्याय ३०

Webdunia
दत्ताधिष्ठित माहोर । तेथें गोपीनाथ विप्र । तया होउनी मेले पुत्र । दत्तवर वांचवी एक ॥१॥
ते निष्ठा दत्तावर । ठेउनी करिती संस्कार । त्याचा विवाह केला थोर । हर्षे सादर मायबापें ॥२॥
त्यां होय रुप समान । साजे जोडें देवासमान । पतिसेवेवांचून । सतीमन न विसंबे ॥३॥
सून महा पतिव्रता । तयां हर्ष हो पहातां । तंव आली दुर्दैवता । रोग सुता त्या हो असाध्य ॥४॥
होऊन क्षयरोग । क्षीण झालें पतिचें आंग । जेवीना तो तसी चांग । सती हो रोग नसतांही ॥५॥
हो पश्चात्ताप द्विजांला । व्यर्थ वरिली सुभगेला । म्हणे तुझा भोग सरला । माहेराला जांई सुखें ॥६॥
ती भयंकर वाचा । ऐकून म्हणे तुमचा । जेथ देह तेथ हा साचा । असे तुमचा अर्धात्मा हा ॥७॥
नसो वियोग म्हणून । सासुसासर्‍यां प्रार्थून । धवा घेऊन डोंळींतून । ये गाणगाभुवना ॥८॥
त्रिदोष वाढुनी जाण । द्विज झाला गतप्राण । सती उठे द्याया प्राण । निवारण करी जन ॥९॥
तीं तयाचे आठवी गूण । रडे शीर्ष आपटून । म्हणे रुसे गौरिरमण । कोण चोरुन ने सौभाग्या ॥१०॥
जैं धेनु जातां शरण । राखुनि घे यवन प्राण । भेटूं जातां देवा पडून । टाकीं चुरुन देऊळ कीं ॥११॥
तेणें अप्री झालें मज । देवा शरण येतां आज । न राखसी माझी लाज । देवा तुज कींव न ये कीं ॥१२॥
ती असे करी विलाप । तंव आला आपोआप । तो दीनाचा मायबाप । गुरु रुप पालटोन ॥१३॥
तीसि वदे कां रडसी । जीव ये कीं रडतां यासी । मायामय संबंधासी । व्यर्थ म्हणसी पति मेला ॥१४॥
देव तेही काळाधीन । तुम्ही तरी मर्त्य जाण । पाहूं जातां विचारुन । मेला कोण कोण जन्मला ॥१५॥
देह उत्पन्न होऊन । मरे त्याहुन विलक्षण । आत्मा निंत्य विकारहीन । संबंधी न कवणाचा तो ॥१६॥
त्या उत्क्रान्तीव्यापकाकैंची । वार्ता न त्या संबंधाची । नदीकाष्टवत्‌ हो देहांची । भेटी हेची कर्मयोगें ॥
ह्या अमंगळ देहाच्या । तादात्में भ्रम कर्मांचा । गुणमूल अज्ञानाचा । हो कीं साचाम परिणाम ॥
तूं अतंद्रित होऊन । दे हा संबंध सोडून । जेणें जासी उद्धरुन । तें साधून घेई शीघ्र ॥१९॥
रक्तास्थि मांसा न रडें । हें ऐकून ती पायां पडे । म्हणे बापा शोकीं पडे । काढा कडे सोयरे तुम्हीं ॥
इति श्री०प०प०वा०स०वि० सारे प्रेतांगनाशोको नाम त्रिंशो०

संबंधित माहिती

Mohini Ekadashi 2024 : अनेक वर्षांनंतर मोहिनी एकादशीला अतिशय दुर्मिळ भद्रावास योग

मोहिनी एकादशी 2024 रोजी हे उपाय केल्याने 3 राशींचे भाग्य बदलू शकते

रविवारी करा आरती सूर्याची

Buddha Purnima 2024 बुद्धपौर्णिमेला 3 शुभ योग, 5 पैकी कोणतेही एक काम करा चमत्कार घडेल !

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

पुढील लेख
Show comments