सिद्ध संक्षेपें सांगत । श्रीपाद तेथूनि येत । कृष्णातीरीं होयी स्थित । कुरुपुरांत तारक ॥१॥ मूर्ख प्रजासमवेत । लोकनिंदेनें हो त्रस्त । जीव द्याया कृष्णेंत । आकस्मात देखे देव ॥२॥ प्रभू तिला निरोपिती । आत्महत्या दुस्तर म्हणती । जन्मांतरीं सुपुत्राप्ती । व्हाया प्रार्थी मग ती नारी ॥३॥ तन्निष्ठा ओळखून ।...