Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिवाळी पुराण आणि इतिहास

Webdunia
दिवाळीसंदर्भात असलेल्या गमतीदार माहितीने पुराणात तसेच इतिहासात आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच हा सण एखाद्या विशिष्ट समूहाचा न राहता संपूर्ण राष्ट्राचा बनला आहे. दिवाळीविषयी काही रंगतदार व गमतीदार माहिती खालीलप्रमाणे:- 
1. प्रभू राम रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परतत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी दिवे लावून स्वागत केल्याचे त्रेतायुगात सांगितले आहे.
2. श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध केल्यानंतर गोकुळवासियांनी आपला आनंद दिवे लावून व्यक्त केल्याची कथा प्रचलित आहे.
3. देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसांचा वध केला होता. त्याचा वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हता, तेव्हा भगवान शंकराने स्वत: देवीच्या चरणी लोटांगण घातले. शंकराच्या शरीर स्पर्शाने महाकालीचा क्रोध शांत झाला. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रौद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे.
4. बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता. या विजयाने भयभीत झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वामन रूप धारण करून बळी राजाला तीन पायांत दान मागितले. विष्णूने तीन पायाने त्र्यैलोक्य घेतले. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पाताळाचे राज्य देवून भू- लोकवासी त्याच्या आठवणीनिमित्त प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील असे आश्वासन दिले.
5. शिखांचे सहावे गुरू हरगोविंदसिंग बादशाह जहांगीरच्या कैदेतुन सुटून कार्तिक अमावस्येच्या दिवशी अमृतसरला आले होते.
6. दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. यामुळे आनंदी झालेल्या गोकुळवासियांनी दुसर्‍या दिवशी अमावस्येला दिवे लावून आनंद साजरा केला होता.
7. इसवी सन पूर्व 500 वर्षापूर्वी मोहेंजोदडो येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये एका मातीच्या मूर्तीनुसार त्याकाळी दिवाळी साजरी केली जात असल्याचे समजते. मूर्तीच्या दोन्ही बाजूला दिवे जळताना दिसून येत होते.
8. इसवी सन पूर्व 2500 वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून ‍दिवाळी साजरी केली होती.
9. सम्राट विक्रमादित्याचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्याच दिवशी दिवे लावून जनतेने आनंद साजरा केला होता.
10. इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील कौटिल्य अर्थशास्त्रानुसार कार्तिक अमावस्येच्या दिवशी मंदिरात आणि घाटावर (नदी किनारी) मोठ्या प्रमाणात दिवे लावले जात असल्याचे सांगितले आहे.
11. अमृतसर येथील सुवर्णमंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरू झाले होते.
12. जैन धर्माचे चोविसावे तीर्थकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशीच बिहारमधील पावापुरी येथे आपल्या शर‍ीराचा त्याग केला होता. 'महावीर सवंत्' त्यांच्या दुसर्‍या दिवशी सुरू होते. त्यामुळे अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षाची सुरवात मानतात. प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे. महावीर निर्वाणामुळे जी अंर्तज्योती कायमची विझून गेली होती, तिची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण बर्हिज्योतीचे प्रतीक म्हणून दिवे लावू या असे कल्पसूत्रात सांगितले आहे.
13. पंजाबमध्ये जन्मलेल्या स्वामी रामतीर्थ आणि महाप्रयाण या दोघांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्यांनी दिवाळीच्या दिवशी गंगाकिनारी स्नान करताना 'ओम' म्हणून समाधी घेतली होती.
14. महर्षी दयानंदांनी दिवाळीच्या दिवशी अजमेरजवळ समाधी घेतली होती. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती.
15. मोगल सम्राट अकबराच्या काळात दौलतखान्यासमोर 40 गज उंच बांबूवर एक मोठा आकाशकंदील लटकविला जात असे. यावेळी बादशहा देखील दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करत असे.
16. मोगल वंशाचे शेवटचे सम्राट बहादुरशहा जफर दिवाळी सणाच्या रूपात साजरी करत असत आणि यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होत असत.
17. शहा आलम दुसरा याच्या काळात संपूर्ण शाही महाल दिव्यांनी सजविला जात असे आणि लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदू-मुसलमान सहभागी होत असत.

संबंधित माहिती

श्री गणपती स्तोत्र : प्रणम्य शिरसा देवं...

Budhwar Upay करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी बुधवारी गणेश मंत्रांचा जप करा, प्रगती होईल

आरती बुधवारची

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

Ganpati Aarti जयदेव जयदेव जयजय गजवदना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा

CBSE इयत्ता 11वी-12वीच्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल होणार

सर्वांना 25 लाखांचा कॅशलेस विमा

गुगल आता फुकट नाही, सर्च करण्यासाठी पैसे द्यावे लागतील

भीमा कोरेगाव प्रकरणी शोमा सेन यांना जामीन मंजूर, या अटी घातल्या

पुढील लेख
Show comments