या कलशातील पाणी पूजेसाठी घ्यायचे आहे. कलशाची पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी-
कलशः कीर्तिमायुष्यं प्रज्ञां मेधां श्रियं बलम् ।
योग्यतां पापहानिं च पुण्यं वृद्धिं च यच्छति ॥
सर्वतीर्थमयो यस्मात्सर्वदेवमयो यतः ।
अतो हरिप्रियोऽसि त्वं पूर्णकुंभ नमोऽस्तुते ॥
शंखपूजा -
शंख असल्यास शंखाला स्नान घालून, पुसून जागेवर ठेवून त्याला गंधफूल वाहावे. अक्षता वर्ज्य. शंखात तीन पळ्या शुद्ध पाणी घालावे. पाण्यात तुलसीपत्र ठेवावे. तो देवाच्या उजव्या बाजूस ठेवावा.
श्रीगणेशांगभूत ऋद्धिसिद्धींची पूजा - हळदकुंकू सुपारीवर वाहावे
श्रीमहागणपतये नमः । पूजार्थे पुष्पाणि समर्पयामि ।
फूले वाहावीत. ही सुपारीच्या मानाने स्वल्प असावीत-
श्रीमहागणपतये नमः । धूपं समर्पयामि ।
उदबत्ती लावून ती उजव्या हाताने देवाला ओवाळावी. डाव्या हातात घंटा घेऊन त्यावेळी घंटानाद करावा-
श्रीमहागणपतये नमः । दीपं समर्पयामि ।
नीरांजन लावून उदबत्तीप्रमाणेच ओवाळावे. त्यावेळी घंटानाद करावा -
श्रीमहागणपतये नमः । (नैवेद्याचे नाव घ्यावे) नैवेद्यं समर्पयामि ।
सुपारीसमोर पाटावर पाण्याने लहानसा चौकोन करून त्यावर दूध किंवा जो नैवेद्य असेल तो ठेवावा. त्याभोवती पाणी परिसिंचन करावे व नैवेद्यावर दूर्वेने किंवा फुलाने पाणी शिंपडावे. प्राणाय स्वाहा इत्यादि स्वाहाकार दोनदा म्हणावेत. प्रत्येक वेळी देवाला घास भरवीत आहोत अशी क्रिया उजव्या हाताने करावी -
कलशाजवळच जमाखर्चाच्या वह्या, लेखणी, दौत, तराजू, वजने इत्यादि ठेवावे. वह्या त्यांचे पहिले पान उघडून ठेवाव्यात. लक्ष्मी-कुबेर व सरस्वतीस्वरूप म्हणून
चांदीचे लक्ष्मी छापाचे नाणे, सुवर्णादि धातूचे दागिने, लक्ष्मी व सरस्वती मूर्ती, लक्ष्मी व सरस्वती यांच्या तसबिरी ठेवाव्यात. मूर्ती किंवा नाणे ताम्हनात तांदळावर ठेवावे. दागिने पाटावर वस्त्र घालून त्यावर ठेवावेत. तसबिरी पाटावर, चौरंगावर किंवा भिंतीला टेकून ठेवाव्यात.
श्रीलक्ष्मीध्यान
या सा पद्मासनस्था विपुलकटितटी पद्मपत्रायताक्षी ॥
गंभीरावर्तनाभिः स्तनभरनमिता शुभ्रवस्त्रोत्तरीया ॥
या लक्ष्मीर्दिव्यरूपैर्मणिगणखचितैः स्नापिता हेमकुंभैः ।
देवीची मूर्ती असेल तर ती ताम्हनात घेउन त्यावर पंचामृत वाहावे. प्रत्येक पदार्थानंतर शुद्धोदक अर्पण करावे. तसबीर असेल तर पंचामृताचे पदार्थ फुलाने किंचित् शिंपडावे व शुद्धोदक उजव्या हाताने ताम्हनात सोडावे-
पंचामृतसमायुक्तं जान्हविसलिलं शुभम् ।
गृहाण विश्वजननि स्नानार्थं भक्तवत्सले ॥
पयो दधि घृत चैव मधुशर्करया युतम् ।
पंचामृतेन स्नपनं क्रियतां परमेश्वरि ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः ।
या मंत्राने पुढील क्रमाने एकैकशः पंचामृत व जल अर्पण करावे -
देवीला पंचामृताचा नैवेद्य दाखवावा - पाटावर पाण्याने लहानसा चौकोन करून त्यावर पंचामृताचे कचोळे ठेवावे. त्याभोवती उजव्या हाताने पाणि परिसिंचन करावे व नैवेद्यावरही फुलाने किंचित्त् पाणी शिंपडावे. प्राणाय स्वाहा । इत्यादि प्राणाहुती दोनदा म्हणाव्यात, उजव्या हाताने देवीला नैवेद्य भरवीत आहोत अशी क्रिया करावी -
लक्ष्मीची मूर्ती असेल तर ताम्हनात ठेवून पळी पळी पाण्याने अभिषेक करावा, तसबीर असेल तर फुलाने पाणी शिंपडीत असता श्रीसूक्त किंवा या देवीची १०८ नावे म्हणावीत.
साखरफुटाणे, बत्तासे, पेढे किंवा जो नैवेद्य असेल तो पात्रात देवीपुढे ठेवावा. पात्राखाली पाण्याने लहानसा चौकोन करून वर पात्र ठेवावे. नैवेद्यावर तुलसीदलाने उदक प्रोक्षण करावे. प्राणाय स्वाहा इत्यादि प्रत्येक स्वाहाकार म्हणताना देवीला उजव्या हाताने नैवेद्य भरवीत आहोत अशी कृती करावी. नैवेद्यावर पळीभर पाणी उजव्या हाताने फिरवावे.