Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Diwali Special Faraal : खमंग चविष्ट बाकरवडी रेसिपी

Webdunia
सोमवार, 24 ऑक्टोबर 2022 (06:23 IST)
दिवाळी आली की दिवाळी साठी फराळ करण्याची तयारी सुरु होते. लाडू, चिवडा, शंकरपाळी, करंज्या, चकल्या, अनारसे, सर्व फराळाचे साहित्य बनवायला गृहिणी लागतात. दिवाळीच्या फराळासाठी खमंग भाकरवडी बनवू या. चला साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य- 
2 कप मैदा,2-3 मोठा चमचा हरभराडाळीचे पीठ,चवीपुरते मीठ,1 चमचा तेल,1 लहान चमचा ओवा,
 
सारणासाठी साहित्य-
1 मोठा चमचा हरभराडाळीचे पीठ,1 लहान चमचा तीळ,1 लहान चमचा खसखस,1 लहान चमचा आलं लसूण पेस्ट,लाल,2 चमचे तिखट,1 चमचा पिठी साखर,1 लहान चमचा गरम मसाला,1 चमचा धणेपूड,1 चमचा बडी शोप,1 चमचा किसलेले सुके खोबरे,3 -4 चमचे बारीक शेव,मीठ.
 
कृती 
मैदा आणि  हरभराडाळीचे पीठ एकत्र करून त्यात मीठ आणि ओवा घाला.तेल गरम करून त्या पिठात घाला.पाणी घालून घट्ट कणिक मळून घ्या.त्याला झाकून 15 -20 मिनिटे बाजूस ठेवा.
 
सारणासाठी -
सर्वप्रथम तीळ आणि खसखस भाजून घ्या,सारणासाठी लागणारे सर्व जिन्नस एकत्र करून तेलावर परतून घ्या.सारण तयार झाले.आता  मैद्याची एक मोठी पोळी लाटून घ्या. त्या पोळीत हे सारण 1-2 चमचे घेऊन पसरवून द्या. आता त्या पोळीचा गुंडाळा करून रोल बनवा.सुरीने 1 -1  इंचचे काप कापा. सर्व काप कापले गेल्यावर हे केलेले काप कढईत तेल तापत ठेवा आणि तेल गरम झाल्यावर त्या तेलात सोडा आणि तांबूस सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या. खमंग खुसखुशीत बाकरवडी खाण्यासाठी तयार.बाकरवडी थंड झाल्यावर हवाबंद डब्ब्यात भरून ठेवा.  
 
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments