Marathi Biodata Maker

Diwali sweet Peanut katli Recipe दिवाळीसाठी बनवा शेंगदाणा कतली

Webdunia
बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (23:19 IST)
सणासुदीत गोडधोड खातो.आपण काजू कतली या मिठाई बद्दल ऐकले आहे आणि खळली देखील आहे. काजू कतली हे सर्वानाच आवडणारी मिठाई आहे.  बहुतेक लोक बाजारातून काजू कतली विकत घेऊन आपल्या घरी आणतात. सध्या  बाजारात काजू एवढा महाग असताना काजू कतलीचा भाव वाढणे स्वाभाविक आहे.काजू कतली महागडी मिठाई आहे. आपण घरी शेंगदाण्यापासून देखील शेंगदाणा कतली बनवू शकता. शेंगदाण्याची कतली खायला खूप चविष्ट असते आणि चव थोडी काजू कतलीसारखी असते. त्यामुळे काजुकटलीच्या जागी तुम्ही ते खूप कमी खर्चात बनवू शकता. चला तर मग या दिवाळीसाठी बनवा खास शेंगदाणा कतली.साहित्य आणि कृती जाऊन घेऊ या. 
 
साहित्य- 
1 वाटी  शेंगदाणे
2 चमचे दूध पावडर
1 वाटी  साखर
1/2 पाणी
1-2चमचे साजूक तूप
 
कृती- 
शेंगदाणा कतली बनवण्यासाठी सर्वप्रथम  शेंगदाणे खरपूस भाजून घ्या. यासाठी गरम करण्यासाठी कढई ठेवा. कढईत शेंगदाणे हलके तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या . भाजल्यानंतर ताटात काढून चोळून  सर्व साले काढून टाका.
शेंगदाण्याची साले काढल्यानंतर ते सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्या. बारीक झाल्यावर चाळणीतून पावडर गाळून एका मोठ्या भांड्यात ठेवा.आता शेंगदाणा पावडरमध्ये मिल्क पावडर घाला , चांगले मिसळा आणि बाजूला ठेवा.

गोडपणासाठी पाक तयार करा. कढईत एक वाटी साखर आणि अर्धा वाटी पाणी घाला. चंगळ उकळू द्या. पाक तयार झाल्यावर त्यात शेंगदाणे आणि मिल्क पावडर घाला, ते एका पॅनमध्ये ठेवा आणि ते घट्ट गोळा होई पर्यंत शिजवा. मिश्रण सतत ढवळत राहा आणि गोळा तयार झाल्यावर  कढई  गॅस वरून खाली काढून घ्या. मिश्रण चांगले मळून घ्या आणि एका ट्रेमध्ये तूप लावून हे मिश्रण लाटून घ्या.
लाटल्यानंतर चाकूच्या साहाय्याने कतलीच्या आकारात कापून घ्या दिवाळीसाठी खास शेंगदाणा कतली खाण्यासाठी तयार. 









Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

Subhash Chandra Bose Jayanti नेताजी सुभाष जयंती भाषण मराठीत

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

माघी गणेश जयंती निमित्त बाप्पाला अर्पण करण्यासाठी पारंपारिक आणि खास पाककृती

सुंदर त्वचेसाठी लावा हे स्ट्रॉबेरी मास्क

चिंता करणे थांबवण्यासाठी Scheduled Worry Time पाळा

पुढील लेख
Show comments