Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दसरा आणि विजयादशमी मध्ये काय अंतर आहे जाणून घ्या

दसरा आणि विजयादशमी मध्ये काय अंतर आहे जाणून घ्या
, शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (09:56 IST)
आपल्या देशात आश्विन महिन्यात दसरा किंवा विजयादशमीचा सण अति उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी रावणाचे दहन केले जाते. लोकं देवी आईच्या मूर्ती आणि जव किंवा जवारे यांचे विसर्जन करतात. या दिवसाला दसरा देखील म्हणतात आणि विजयादशमी देखील म्हणतात. दोन्ही मध्ये काय अंतर आहे जाणून घेऊ या. 
 
प्राचीन काळापासून आश्विन महिन्यातील शुक्लपक्षाच्या दशमीला विजयादशमीचा सण साजरा केला जात आहे. मग या दिवशी जेव्हा प्रभू श्रीरामाने लंकापती रावणाला ठार मारले म्हणजे त्याचा दहन केला तर त्या दिवसापासून या दिवसाला दसरा देखील म्हणू लागले.
 
1 असुरांचा वध : सर्वप्रथम या दिवशी आई दुर्गेने महिषासुराचा वध केला असे. रम्भासुराचा मुलगा महिषासुर होता, जो फार सामर्थ्यवान होता. त्यांनी कठोर तपश्चर्या करून परमपिता ब्रह्माला प्रसन्न केले. त्यावर ब्रह्माजींनी प्रगट होऊन त्याला म्हणे 'बाळ तू मृत्यूला सोडून, काही ही मागणी कर' महिषासुराने फार विचार केला आणि म्हणे - ठीक आहे देवा माझी मृत्यू असुर आणि मानव कोणाकडून ही न होवो. माझी मृत्यू एखाद्या बाई कडून व्हावी अशी माझी इच्छा आहे. ब्रह्माजी तथास्तु म्हणून निघून गेले. 
 
ब्रह्माजीं कडून वर मागून त्याने तिन्ही लोकांवर आपले आधिपत्यं गाजवले आणि त्रिलोकाधिपती बनला. तेव्हा सगळ्या देवी-देवांनी मिळून आई भगवती महाशक्तीला बोलावले त्यांची पूजा केली. सर्व देवी-देवांच्या शरीरातून एक तेजःपुंज निघाले आणि त्यापासून एका सुंदर स्त्रीचे निर्माण झाले. हिमवान यांनी तिला वाहन म्हणून सिंह दिले. सर्व देवांनी आपले अस्त्र शस्त्र महामायाच्या सेवेत दिली. भगवतीने प्रसन्न होऊन त्यांना लवकरच महिषासुराच्या भीतीपासून मुक्त करण्याचे आश्वासन दिले. 
 
देवी आईने महिषासुराशी तब्बल नऊ दिवस युद्ध केले आणि 10 व्या दिवशी त्याला ठार मारले. म्हणून हा दिवस विजयादशमीचा सण म्हणून साजरा करतात. महिषासुर एक राक्षस नसून दैत्य किंवा असुर होता.
 
2 राक्षसाचा वध : असे म्हणतात की प्रभू श्रीराम आणि रावणाचे युद्ध बऱ्याच दिवसा पर्यंत चालले असे. शेवटी रामाने दशमीच्या दिवशी रावणाचा वध केला. रावण हा एक राक्षस होता तो असुर किंवा दैत्य नसे.
 
3 धर्माचा विजय : असे ही म्हणतात की या दिवशी अर्जुनाने कौरवांच्या लाख सैनिकांना मारून कौरवांचा पराभव केला. हा धर्माचा अधर्मा वर विजय होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुष्टांचा विनाश करणारी कालरात्री