Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दसर्‍याला करा हे 10 पारंपरिक काम

दसर्‍याला करा हे 10 पारंपरिक काम
, शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (22:10 IST)
विजयादशमीला परंपरेचं पालन करुन हे 10 कार्ये केल्याने शुभ फल प्राप्ती होते. 
 
1. दसर्‍याला वाहन, शस्त्र, पुस्तकं, तसेच राम लक्ष्णम, सीता व हनुमान, देवी दुर्गा, गोकर्णाची फुलं आणि शमीच्या झाडाची पूजा करावी.
 
2. दसर्‍याला रावण दहन बघायला जाताना कपाळावर टिळा लावावा.
 
3. रावण दहन झाल्यावर परत येताना आपट्याची पाने आणावी. घरी आल्यावर कर्त्या पुरूषांनी सीमोल्लंघन करावे. सोने घेऊन देवीचे दर्शन घ्यावे. नंतर 
 
बहिणीकडून किंवा घरातील मुख्य सवाष्ण स्त्रीकडून ओवाळून घ्यावे.
 
4. या सणात एकमेकांना भेटून, मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन प्रेम संबंध निर्मित व्हावे अशी वागणूक असावी. सर्वांना स्वर्ण प्रतीक रुपात आपट्याची पाने द्यावी.
 
5. या दिवशी घरातील लहान मुलांना भेट वस्तू, मिठाई देण्याची परंपरा असते.
 
6. या दिवशी गिलकीचे भजे आणि गोड भजे तयार करण्याची परंपरा आहे. 
 
7. या दिवशी दुर्गा सप्तशती किंवा चंडी पाठ करावा.
 
8. दसर्‍याला पिंपळ, शमी आणि वडाच्या झाडाखाली तसेच मंदिरात दिवा लावावा. या दिवशी घरात देखील रोशनी असावी.
 
9. या दिवशी आपल्या आंतरीक वाईट विचारांचा खात्मा करुन चांगल्या वागणुकीचा संकल्प घ्यावा.
 
10. या दिवशी सर्व वैर विसरुन, इतरांच्या चुका माफ करुन नव्याने नाती जोडण्याचा प्रयत्न करावा. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दसरा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक