साहित्य-
दोन कप -मखाना
अर्धा कप -बदाम
एक कप -साखर
एक चमचा -तूप
एक चमचा -वेलची
चिमूटभर -केशर
पिस्त्याचे तुकडे
गुलाबाच्या पाकळ्या
कृती-
सर्वात आधी गॅस वर कढई ठेऊन त्यामध्ये तूप घालावे आणि मखाने चांगल्या प्रकारे भाजून घ्यावे. आता थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक काढून घ्यावे. आता एका मोठ्या पॅनमध्ये दूध ठेवा आणि ते चांगले उकळवा. दूध उकळू लागले की त्यात एक चमचा वेलची आणि चिमूटभर केशर घाला. आता त्यात बारीक केलेले मखाना आणि बदाम घाला. ते मंद आचेवर शिजवा. आता काही वेळाने त्यात साखर घाला. दूध घट्ट होईपर्यंत हे शिजवावे लागतात.जेव्हा मखाना आणि बदाम दुधात चांगले वितळतील तेव्हा गॅस बंद करा. आता सजवण्यासाठी पिस्त्याचे तुकडे आणि काही गुलाबाच्या पाकळ्या घाला. तर चला तयार आहे आपली उपवासाची मखाना बदाम रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik