Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 4 April 2025
webdunia

Fasting Recipe कुरकुरीत बटाटा चिवडा

aloo chivda
, शनिवार, 29 मार्च 2025 (14:49 IST)
साहित्य-
आठ - बटाटे 
दोन - लिंबू 
एक टीस्पून- काळी मिरी पावडर 
दोन टीस्पून- जिरे पूड 
शेंगदाणा तेल 
आमसूल पूड 
सेंधव मीठ
ALSO READ: Fasting Recipe मखाना पराठा चैत्र नवरात्रीत नक्की ट्राय करा
कृती- 
सर्वात आधी बटाटे सोलून घ्या, आता पाण्याने चांगले धुवा आणि स्वच्छ करा. तसेच लांब पट्ट्या बनवण्यासाठी खवणी वापरा. आता हे तयार केलेले फ्लेक्स ५-६ वेळा स्वच्छ पाण्यात टाका आणि त्यातील स्टार्च काढून टाका. स्टार्च काढून टाकल्याने, बटाटा कमी तेल शोषेल आणि नमकीन बराच काळ कुरकुरीत राहील. आता पाण्यातून फ्लेक्स काढा आणि त्यात दोन लिंबाचा रस घाला आणि हलक्या हातांनी फ्लेक्सवर पसरवा. यानंतर, लिंबू-मिश्रित फ्लेक्सवर गरम पाणी घाला आणि त्यांना फक्त पाच मिनिटे झाकून ठेवा; आता ते गाळून चाळणीत काढा आणि जास्तीचे पाणी निथळल्यानंतर ते  कापडावर पसरवा. बटाट्याच्या पट्ट्या पूर्णपणे कोरड्या असाव्यात. आता पॅनमध्ये शेंगदाण्याचे तेल गरम होऊ द्या. गरम तेलात काही फ्लेक्स घाला व तळून घ्या. तसेच तुम्ही शेंगदाणे देखील तळून चिवड्यामध्ये टाकू शकतात. आता एका बाऊलमध्ये काढून आमसूल पूड मीठ, जिरे पूड,  मिरे पूड घाला. तसेच तुम्हाला तिखट आवडत असल्यास तुम्ही तिखट देखील घालू शकतात. व चांगल्या प्रकारे मिक्स करा. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही वरून काजू, मनुके देखील घालू शकतात. तर चला तयार आहे आपली उपवास रेसिपी बटाटा चिवडा, नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी