Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उपवासाला बनवा पटकन शिंगाडा-भगर कटलेट रेसिपी

सिंगाडा-भगर कटलेट रेसिपी
, सोमवार, 25 ऑगस्ट 2025 (08:00 IST)
साहित्य 
भगर - एक वाटी
शिंगाडा पीठ - अर्धा वाटी
उकडलेले मॅश केलेले बटाटे - दोन 
चिरलेले हिरव्या मिरच्या - दोन 
बारीक चिरलेली कोथिंबीर 
जिरे - १/४ चमचा
लिंबाचा रस - एक चमचा
रॉक मीठ -अर्धा चमचा
तेल
ALSO READ: Sabudana Cutlet झटपट साबुदाणा कटलेट बनवा
कृती- 
सर्वात आधी भगर एक तास भिजत घालावी. आता त्यात शिंगाडा पीठ, मॅश केलेले बटाटे, हिरव्या मिरच्या तुकडे, कोथिंबीर, जिरे, लिंबाचा रस आणि सेंधव मीठ घालावे  सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स करा. आता एक चमचा मिश्रण तळहातावर ठेवा आणि इच्छित आकारात कटलेट बनवा. व आता पण गॅस वर ठेऊन त्यात उपवासाचे तेल घालावे व सर्व कटलेट मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत तळून घ्यावे. तयार कटलेट एका प्लेटमध्ये काढून नारळाच्या चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सकाळीपेक्षा रात्री रक्तदाब जास्त वाढतो का? सत्य जाणून घ्या