Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोल्डन बुटाच्या शर्यतीत हॅरी केनसह रोमेलू लुकाकू

गोल्डन बुटाच्या शर्यतीत हॅरी केनसह रोमेलू लुकाकू
मॉस्को , मंगळवार, 10 जुलै 2018 (15:23 IST)
रशियात खेळल्या जात असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गोल्डन बुटाच्या  शर्यतीत इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन आघाडीस आहे तर बेल्जियमचा रोमेलू लुकाकू शर्यतीत आहे.
 
प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेत कोण गोल्डन बूट मिळवितो याकडे जगाचे लक्ष लागले आहे. 64 पैकी 60 सामने पार पडले आहेत. दोन उपान्त्य व अंतिम सामना बाकी आहे. मंगळवारी फ्रान्स- बेल्जियम, बुधवारी इंग्लंड- क्रोएशिया अशा उपान्त्य लढती होतील.
 
विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्पत आहे. या दोघांना पुढील दोन सामन्यात चमकदार कामगिरी करण्याची संधी आहे. हॅरी केनने इंग्लंडकडून आतार्पंत सहा गोल करून तो आघाडीस आहे. लुकाकूच्या नावावर चार गोल आहेत. त्यामुळे या दोघांच्या कामगिरीवर लक्ष राहील.
 
रशियाचा डेनिस चेरिसेव व पोर्तुगालचा ख्रिस्तियाने रोनाल्डो यांनी प्रत्येकी चार गोल केले. परंतु त्यांचे  संघ पराभूत झाले आहेत. फ्रान्सचा काइलिन एमबामे व अंटोनी ग्रीझमन यांनीही प्रत्येकी तीन गोल केले असून त्यांनाही संधी आहे. फ्रान्सच्या जस्ट फोंटेनने 1958 च्या विश्वचषक स्पर्धेत 13 गोल करून गोल्डन बूट मिळविला होता. बेल्जियमच्या एकाही खेळाडूला गोल्डन बुटाचा मान मिळविता आला नाही.
 
ख्रिस्तियाने रोनाल्डो (पोर्तुगाल), लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना), नेयमार (ब्राझील) हे स्टार खेळाडू त्यांचे  संघ हरल्यामुळे स्पर्धेबाहेर पडले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केजरीवाल आणि हजारे यांचे नाते सुधारणार ?