(गीति) गणपति म्हणे वरेण्या, श्रौतःस्मार्तादि कर्मं करिं नित्य । फलइच्छारहित अशीं, मात्र करावीं सशास्त्रशीं विहित ॥१॥ न करी कर्म असा जो, योगाच्या आश्रयीं सदा योगी । १. त्यापेक्षां कर्माचें, जो फल नेच्छीत श्रेष्ठसा योगी ॥२॥ योगप्राप्तीकरितां, कर्म असे योग हेंच साधन हें । ...