सिंहगडाच्या घाटात अकरा हजाराचा टप्पा म्हणून वळण ओळखलं जातं, तिथे एका झाडाखाली असणारी वैशिष्टयेपूर्ण मूर्ती लक्ष वेर्धन घेते. रस्त्याचं काम सुरू असताना ही मूर्ती तिथे मिळाल्याचं सांगितलं जातं. तिथेच झाडाखाली तिची स्थापना करण्यात आली आहे. गणरायाच्या हातातील शस्त् र, गळ्यातील माळ ओळखू येते. घाटरस्त्यानं गडावर जाताना अवचित येणारा उदबत्तीचा सुगंध आणि गणेशदर्शन मनाला सुखावून जातं.
कोराईगडाच्या कुशीतला बाप्पा
लोणावळ्याजवळचा कोराईगड परिसर पुणे-मुंबईकरांचा अत्यंत आवडता आहे. कित्येक शतकांचा इतिहास लाभलेल्या या गडाच्या कुशीतल्या लेण्यांमध्ये बाप्पाचं देखणं रूप वसलं आहे. पेठ शहापूर गावातून मळलेल्या पायवाटेनं गडावर जाताना गडाच्या निम्म्या टप्प्यावर असणार्या लेणीतलं बाप्पाचं दर्शन सुखावते. डोक्यावरील मुकुट, मागील दोन्ही हातातील परशू, प्रसन्न मुद्रा, उजवा हात आशीर्वचनी तर डाव्या हाती प्रसाद, असं हे गणेशरूप कोरीव कमानीत विराजमान आहे.