Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पर्वतावरील देखणा घाटातला गणेश

वेबदुनिया
जुन्नर तालुका हा ऐतिहासिक आणि पौराणिक स्थळांचा खजिना. जुन्नरपासून अवघ्या 12 किलोमीटरवर असणार्‍या हडसर उर्फ पर्वतगडावरील देखण्या बाप्पाचं दर्शन आवर्जून घ्यायला हवं. गडावरील भगवान शंकरांच्या मंदिरात गणरायाची ही देखणी मूर्ती विराजमान झालेली आहे. चतुर्भुज, शेंदूरचर्चित गणरायांच्या मागील दोन्ही हातांत परशू आहे. चारही हात आणि पायांमध्ये माळा आहेत. मुकुटावरही माळेची नक्षी आणि नागाच्या फणा कोरण्यात आल्या आहे. गडाची कातळकोरीव वाट आणि बाप्पांचं इथे घडणारे दर्शन सुखावून जाते. 

WD

सिंहगडाच्या घाटात अकरा हजाराचा टप्पा म्हणून वळण ओळखलं जातं, तिथे एका झाडाखाली असणारी वैशिष्टयेपूर्ण मूर्ती लक्ष वेर्धन घेते. रस्त्याचं काम सुरू असताना ही मूर्ती तिथे मिळाल्याचं सांगितलं जातं. तिथेच झाडाखाली तिची स्थापना करण्यात आली आहे. गणरायाच्या हातातील शस्त् र, गळ्यातील माळ ओळखू येते. घाटरस्त्यानं गडावर जाताना अवचित येणारा उदबत्तीचा सुगंध आणि गणेशदर्शन मनाला सुखावून जातं.

कोराईगडाच्या कुशीतला बाप्पा

WD

लोणावळ्याजवळचा कोराईगड परिसर पुणे-मुंबईकरांचा अत्यंत आवडता आहे. कित्येक शतकांचा इतिहास लाभलेल्या या गडाच्या कुशीतल्या लेण्यांमध्ये बाप्पाचं देखणं रूप वसलं आहे. पेठ शहापूर गावातून मळलेल्या पायवाटेनं गडावर जाताना गडाच्या निम्म्या टप्प्यावर असणार्‍या लेणीतलं बाप्पाचं दर्शन सुखावते. डोक्यावरील मुकुट, मागील दोन्ही हातातील परशू, प्रसन्न मुद्रा, उजवा हात आशीर्वचनी तर डाव्या हाती प्रसाद, असं हे गणेशरूप कोरीव कमानीत विराजमान आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मोहिनी एकादशी 2024 रोजी हे उपाय केल्याने 3 राशींचे भाग्य बदलू शकते

Maa lakshmi : देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीला या 5 वस्तू अर्पण करा

Sita Navami 2024: आज सीता नवमीचे व्रत केल्याने मिळेल मातृत्व

श्री सीता चालीसा : सीता नवमी या एका उपायाने प्रसन्न होईल देवी

Brihaspativar upay गुरुवारी काय करावे काय नाही जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

पिंपरी चिंचवड मध्ये पत्नीवर पतीचे अमानवीय अत्याचार, आरोपी पतीला अटक

Swati Maliwal :पोटात लाथा मारण्याचा ,स्वाती मालीवाल यांचा एफआयआरमध्ये आरोप

गुजरात 10वी बोर्ड टॉपर हीरचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

पुढील लेख
Show comments