Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोवा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

Webdunia
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (13:51 IST)
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला. ज्यात सरकार स्थापन झाल्यास खाणकाम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी आश्वासन दिले की त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यास किनारपट्टीच्या राज्यात खाणकाम पुन्हा सुरू होईल. काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील काही महत्त्वाच्या मुद्यांवर ते बोलत होते.
 
खाणकामांवर 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती. काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक चिदंबरम म्हणाले की राज्यासाठी समस्या संसाधन शोधण्याची नसून संसाधन वाटपाची आहे. ते म्हणाले की राज्याच्या अर्थसंकल्पासाठी सरकारचे स्वतःचे साधन केंद्र सरकारचा महसूल आणि केंद्र सरकारचे अनुदान असे 3 मार्ग आहेत.

चिदंबरम म्हणाले की निधीचा स्रोत कधीच अडचण नाही परंतु समस्या निधी वाटपाची आहे. जाहिरनाम्यामध्ये जे मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत त्यात निधीचे वाटप समंजसपणे व विचारपूर्वक केल्यास 5 वर्षांत साध्य करता येईल, असे ते म्हणाले.
 
ते म्हणाले की गोवा आयटी आणि फार्मास्युटिकल हब झाल्यास संसाधने अनेक पटींनी वाढतील. पक्ष सत्तेवर आल्यास राज्यात खाणकाम पुन्हा सुरू केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
 
ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आम्ही शाश्वत कायदेशीर खाणकाम सुरू करू शकतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

Cyclone Fengal चा परिणाम महाराष्ट्रावरही दिसणार, या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस नाही तर कोण? जाणून घ्या विलंबाचे खरे कारण

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

पुढील लेख
Show comments