Dharma Sangrah

राहुल गांधींचा दावा, गोव्यात काँग्रेसचे सरकार येणार

Webdunia
शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (09:40 IST)
गोव्यातील कारचोरम येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संबोधित करताना म्हटले की या निवडणुकीत लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. इतरही पक्ष आहेत मात्र त्यापैकी कोणीही सरकार स्थापन करू शकत नाही. सरकार स्थापन झाले तर काँग्रेस पक्षच स्थापन होईल, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
 
काँग्रेस पक्षाचे जे सरकार स्थापन होणार आहे ते कोणत्याही नेत्याचे, कोणा एका व्यक्तीचे सरकार असू नये, अशी माझी इच्छा आहे असे ते म्हणाले. पण ते सरकार गोव्यातील लोकांचे, गोव्यातील तरुणांचे, गोव्यातील शेतकरी, मजूर, छोटे दुकानदार यांचे सरकार असले पाहिजे असेही ते बोलले.

आम्ही जो निर्णय घेऊ तो तुम्हाला विचारल्यानंतर आणि तुमच्याशी बोलून घेऊ.
 
राहुल गांधींनी भाजपवर आरोप करत म्हटले की भाजपने आपल्या जाहीरनाम्यात एकदाही पर्यावरणाचा उल्लेख केलेला नाही. आम्ही गोव्याला कोळसा हब होऊ देणार नाही. यावेळी राहुल गांधी यांनी गोव्यातील लोकांना न्याय योजना गोव्यात लागू करणार असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की आम्ही गोव्यातील गरीब कुटुंबांना महिन्याला 6000 हजार रुपये देऊ. सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के महिलांना आरक्षण देऊ. आम्ही रोजगार निर्मितीसाठी 500 कोटी रुपये ठेवणार. पर्यटन क्षेत्राला पुन्हा एकदा संजीवनी देऊ असे ही ते बोलले.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

सरकारने विमान कंपन्यांसाठी भाडे निश्चित केले आणि विमान कंपनीला हा आदेश दिला

गोवा नाईटक्लब मॅनेजरला अटक, मालकाविरुद्ध अटक वॉरंट जारी

गोव्यात भीषण अपघात: नाईटक्लबला आग, 25 जणांचा होरपळून मृत्यू, 50 जण जखमी

डीजीसीएने इंडिगोच्या सीईओंना कारणे दाखवा नोटीस बजावली, उत्तर न दिल्यास कारवाई केली जाईल

भारताची सीमा पुनिया डोपिंग वादात अडकली, 16 महिन्यांची बंदी घातली

पुढील लेख
Show comments