Dharma Sangrah

गुढीपाडवा माहिती : का साजरा करतात गुढीपाडव्याचा सण

Webdunia
रविवार, 11 एप्रिल 2021 (11:50 IST)
भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस आपण 'गुढीपाडवा' म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी उभारण्यामागील कारण आहे तरी काय जाणून घ्या-
 
गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर गडू बसवून गुढी साकारली जाते. ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतिक मानली जाते. ती विजयाचा संदेशही देत असते. असे म्हणतात की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध केला 
 
होता. त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले होतं. श्रीरामाने वालीच्या रुपात आसुरी शक्तींचा नाश केला होता आणि विजयोत्सव म्हणून गुढी सूचक आहे. 
 
या व्यतिरिक्त ब्रह्मदेवाने याच शुभ मुहूर्तावर सृष्टी निर्माण केली. तर मत्स्य रूप धारण करून भगवान विष्णूंनी शंकासुराचा वध केल्याचे सांगितलं जातं. त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र-शुद्ध प्रतिपदेचाच.
 
एक अजून कारण म्हणजे श्री शालिवाहन राजाने चैत्र शुद्ध प्रतीपदेपासूनच शके गणनेला सुरुवात केली असून मातीचे सैन्य तयार केले. सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यांवर पाणी शिंपडून प्राण फुंकले. सैन्याच्या मदतीने याच दिवशी शकांचा पराभव केला. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरु होत आणि नवीन वर्षाची सुरुवात होते. 
 
तसेच महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राकडून प्राप्त कळकाची काठी जमिनीत रोवून त्याची पूजा केली. नववर्ष प्रारंभीच्या दिवशी या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठला रेशमी वस्त्र घालून, श्रृंगार करुन पूजा करु लागले.
 
असे म्हणतात की याच दिवशी श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.
 
तेव्हापासून विजय, धैर्य, त्याग, आनंद, आरोग्यादायी असे सूचित करणारा हा सण साजरा केला जातो. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. दारी उभारलेली गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे तसंच या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इ. गोष्टी मुहूर्त न बघता केल्या जातात. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

शनिदेवाचा आवडता निळा फूल कोणता? जाणून घ्या खास उपाय

शनिदेवाला तेल अर्पण करताना 'या' नियमांचे पालन करा; अन्यथा पूजेचे फळ मिळणार नाही

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments