rashifal-2026

आजपासून सुरू होत आहे चोर पंचक जाणून घ्या त्याचे प्रभाव...

Webdunia
ज्योतिष शास्त्रात शुभ-अशुभ मुहूर्तांच्या विषयात वेग वेगळ्या मान्यता आहे. हिंदू धर्मात कुठले ही शुभ कार्य करण्याअगोदर शुभ-अशुभ मुहूर्तांबद्दल अवश्य विचार केला जातो. ज्योतिषीप्रमाणे, काही नक्षत्रांमध्ये शुभ कार्य करणे फारच उत्तम मानण्यात येते. तसेच काही नक्षत्रांमध्ये एखादे विशेष कार्य करण्याची मनाई असते. धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती देखील अशाच नक्षत्रांचा समूह आहे. धनिष्ठाच्या प्रारंभापासून रेवती नक्षत्राच्या शेवटापर्यंतचा काळ पंचक असतो.
 
यंदा शुक्रवारी (19 जानेवारी)च्या दुपारी किमान 2 वाजेपासून पंचक सुरू होईल, जे 24 जानेवारी, बुधवारी सकाळी किमान 04.00 वाजेपर्यंत राहणार आहे.  
 
नक्षत्रांचा प्रभाव आणि पंचकाच्या दरम्यान कोणते 5 काम करणे निषेध आहे -
 
1. पंचकात जेव्हा घनिष्ठा नक्षत्र असेल तेव्हा गवत, लाकूड इत्यादी इंधन एकत्रित नाही करायला पाहिजे, याने अग्नीची भिती असते.  
2. पंचकाच्या दरम्यान दक्षिण दिशेत प्रवास करणे टाळावे, कारण दक्षिण दिशा, यमाची दिशा असते. या नक्षत्रांमध्ये प्रवास करणे धोकादायक ठरू शकते.  
3. पंचकात जेव्हा रेवती नक्षत्र सुरू असेल त्या वेळेस घराची छत नाही टाकायला पाहिजे, असे विद्वानांचे मत आहे. यामुळे धन हानी आणि  घरात क्लेश होतो.  
4. पंचकात पलंग तयार करणे देखील अशुभ मानले जाते. विद्वानांनुसार असे केल्याने फार मोठ्या संकट समोर येण्याची शक्यता आहे.  
5. पंचकात शवाचे अंतिम संस्कार करण्याअगोदर एखाद्या योग्य ब्राह्मणाचा सल्ला घ्यायला पाहिजे. जर असे नाही केले तर शवासोबत पाच पुतळे कणकेचे किंवा कुश (एक प्रकारचे गवत)ने बनवून अर्थीवर ठेवायला पाहिजे आणि या पाचींचे शवाप्रमाणे पूर्ण विधीने अंतिम संस्कार करायला पाहिजे, तेव्हा पंचक दोष समाप्त होतो. असे गरूड पुराणात लिहिले आहे.
 
1 . रोग पंचक
रविवारी सुरू होणारा पंचक रोग पंचक असतो. याच्या प्रभावामुळे या पाच दिवसांमध्ये शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. या पंचकात कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य करणे वर्जित असते. शुभ कार्यांमध्ये हे पंचक अशुभ मानले जाते.  
 
2. राज पंचक
सोमवारी सुरू होणार्‍या पंचकाला राज पंचक म्हणतात. हे पंचक शुभ मानले जाते. याच्या प्रभावामुळे या पाच दिवसांमध्ये सरकारी कामांमध्ये यश मिळतो. राज पंचकात संपत्तीशी निगडित कार्य करणे शुभ मानले जाते. 
 
3. अग्नी पंचक
मंगळवारी सुरू होणार्‍या पंचकाला अग्नी पंचक म्हणतात. या पाच दिवसांमध्ये कोर्ट कचेरी निर्णय, आपले हक्क मिळवण्याचे काम केले जातात. या पंचकात अग्नीचा भय असतो. हे अशुभ असते. या पंचकात कुठल्याही प्रकारचे निर्माण कार्य, औजार आणि मशीनरी कामांची सुरुवात करणे अशुभ मानले जाते. यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.  
 
4. चोर पंचक
शुक्रवारी सुरू होणारा पंचक चोर पंचक असतो. ज्योतिषांप्रमाणे या पंचकात प्रवास करण्याची मनाई असते. या पंचकात घेवाण-देवाण,  व्यापार आणि कुठल्याही प्रकारचे सौदे नाही करायला पाहिजे. आणि जर कार्य तुमच्या हाताने केले गेले तर धन हानी होणे निश्चित असते.  
 
5. मृत्यू पंचक
शनिवारी सुरू होणार्‍या पंचकाला मृत्यू पंचक म्हणतात. नावाने ओळखले जाते की अशुभ दिवसापासून सुरू होणारे हे पंचक मृत्यूसमान त्रास देण्यासारखा असतो. या पाच दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचे जोखीमपूर्ण काम नाही करायला पाहिजे. याच्या प्रभावामुळे विवाद, अपघात इत्यादी होण्याचा धोका असतो. 
 
6. त्याशिवाय बुधवार आणि गुरुवारी सुरू होणार्‍या पंचकात वर दिलेल्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे नसते. या दोन दिवसांमध्ये सुरू होणार्‍या पंचकांमध्ये पंचकाचे पाच कामाशिवाय बाकी सर्व शुभ काम करू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Tallest Christmas Tree जगातील सर्वात उंच ख्रिसमस ट्री कुठे आहे? माहित आहे का तुम्हाला?

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

Christmas Special मुलांसाठी बनवा झटपट या रेसिपी

मुंबईतील या ठिकाणी नाताळाचा दिवस भव्य साजरा केला जातो; हे प्रसिद्ध चर्च नक्की एक्सप्लोर करा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

पुढील लेख
Show comments