देऊळ किंवा घरातील देवघरात गरूड घंटी काही विशिष्ट स्थळी लावण्याची प्रथा प्राचीन काळापासूनच सुरू आहेत. घंटी म्हणजे एका विशिष्ट प्रकाराचे नाद, ज्याने सभोवतीला वातावरण शुद्ध होतं.
1 गरूड घंटी : गरूड घंटी लहान असते जी एका हाताने वाजवली जाऊ शकते.
2 दारावरची घंटी : ती दारावर लटकवली जाते. ही मोठी आणि लहान दोन्ही आकारामध्ये असते.
3 हाताची घंटी : पितळ्याची जड एका गोल ताटली सारखी असते ज्याला लाकडाने ठोकून वाजवतात.
4 घंटा : हे फार मोठे असते. कमीत कमी 5 फुटी उंच आणि रुंद. ह्याला वाजवल्यानंतर ह्याचा आवाज कित्येक किलोमीटर पर्यंत जातो.
गरूड : भगवान गरूडाला विष्णूचे वाहन आणि द्वारपाल म्हटले जाते. बऱ्याच देऊळांमध्ये आपल्याला बाहेरचा बाजूला दारापाशी आपल्याला गरूड देवाची मूर्ती दिसते. दक्षिण भारताच्या देऊळात हे बघायला मिळतं.
घंटा असण्यामागील कारण काय ? याचे 5 गुपित जाणून घ्या
1 हिंदू धर्मात सृष्टीच्या निर्मितीमध्ये ध्वनीचे योगदान मानतात. ध्वनीपासून प्रकाशाची उत्पत्ती आणि बिंदू स्वरूप प्रकाशापासून ध्वनीची उत्पत्तीचे सिद्धांत हिंदू धर्मात आहे. सृष्टीच्या निर्माणावेळी झालेला नाद, घंटीच्या ध्वनीला त्याचेच प्रतीक मानले गेले आहेत. हा आवाज ओंकाराचा उच्चारणातून जागृत होतो.
2 ज्या स्थळी नियमाने घंटानाद होतो त्या ठिकाणीच वातावरण नेहमीच शुद्ध आणि पवित्र असतं. ह्यामुळे नकारात्मक शक्ती नाहीश्या होतात.
3. नकारात्मकता गेल्याने समृद्धी होते. सकाळ आणि संध्याकाळी लयबद्ध घंटानाद करण्याचे नियम आहे.
4 घंटीला किंवा घंट्याला काळाचे प्रतीक मानले गेले आहे. अशी आख्यायिका आहे की ज्यावेळी प्रलय येईल त्यावेळी अश्याच प्रकारे घंटानाद होईल.
5 स्कन्द पुराणानुसार देऊळात घंटानाद केल्याने मानवाचे शंभर जन्मांचे पाप नाहीसे होतात. आणि असे ही म्हटले जाते की घंटी वाजवल्यामुळे देवांसमोर आपली उपस्थिती मान्य होते.