Marathi Biodata Maker

कराग्रे वसते लक्ष्मी... सकाळी उठल्यावर का बघतात आपले हात...

Webdunia
सोमवार, 4 एप्रिल 2022 (17:34 IST)
मंगलाचरण
श्रीगणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीसोमेश्वराय नम: । श्री विघ्नेश्वराय नम: । श्रीकुलदेवताभ्यो नम: ।
 
करदर्शन व भूमिवन्दन
व्यक्तीच्या तळहात आणि दहा बोटांमध्ये विविध देवता वास करतात. हे देव दिवसभर व्यक्तीला मदत करतात. या हातांनी दैनंदिन व्यवहार केले जातात. सकाळी उठल्यावर पहिले करदर्शन (हस्तरेचे दर्शन) करा. कर्दर्शन करताना दोन्ही हातांची अंजुली करून त्यात मन एकाग्र करून पुढील श्लोक म्हणा.
 
कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती ।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम ॥
 
अर्थ : जर आपल्याकडे ज्ञान (श्री सरस्वती) आणि धन (लक्ष्मी) असेल तर आपण सत्कर्म करू शकतो. लक्ष्मी हातांच्या अग्रभागी, श्री सरस्वती मध्यभागी आणि गोविंद हातांच्या मुळांमध्ये वास करतात. . त्यामुळे सकाळी उठल्यावर आधी हात पहा.
 
भूमिवन्दन
भूमी म्हणजे पृथ्वी किंवा भूमाता. तुम्ही जमिनीवर चालता. जमिनीमुळे माणसाला धान्य, हिरव्या भाज्या, भाज्या, फळे, पाणी अशा अनेक गोष्टी मिळतात. धान्य पेरण्यासाठी आणि पाण्यासाठी विहिरी करण्यासाठी जमीन खोदली जाते. त्यावेळी होणारे सर्व आघात भूमीने सहन केले. ती लहान-मोठ्या सर्वांचे ओझे सांभाळते, त्यामुळे सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी खालील श्लोकांचे पठण करावे.
 
समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले । 
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ॥
 
अर्थ : समुद्राचे वस्त्र परिधान करणारी, पर्वतासारखी स्तने असलेली आणि भगवान विष्णूची पत्नी असलेल्या भूमीदेवी, मी तुला नमस्कार करतो. माझ्या चरणांचा तुला स्पर्श होईल. यासाठी मला माफ कर.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Friday Remedies: शुक्रवारी या 4 गोष्टी करा, लक्ष्मीची विशेष कृपा मिळवा

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

Makar Sankranti Special Tilgul Poli Recipe मकर संक्रांतीला चटकन तयार करा गुळाची पोळी

स्मार्त आणि भागवत एकादशीमधला भेद जाणून घ्या

भागवत एकादशी व्रताचे महत्त्व

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

पुढील लेख
Show comments