कार्तिक महिना स्नान आणि दानासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नदीत स्नान करावे, यामुळे साधकाची सर्व पापे धुऊन जातात आणि हा नियम पाळणार्यांना मोक्ष प्राप्त होतो. याशिवाय कार्तिक महिन्यात भगवान विष्णू आणि तुळशी मातेची पूजा केल्याने शुभ फळ मिळते. कार्तिक महिन्यात तुळशीच्या पानांनी श्री विष्णूची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. या शिवाय कार्तिक माहात्म्य वाचण्याने पुण्य लाभतं.