आतां पुढील कथा मनोहर । ऐका श्रोते सादर । रुक्मिणीचें स्वयंवर । सांगतों संक्षिप्त परिसावें ॥१॥ बलिराम ज्येष्ठ भ्राता । तेणें रेवतराजसुता । विवाहविधीनें केली कांता । नामें रेवती सद्रुणी ॥२॥ कनिष्ठ बंधु श्रीकृष्ण । रुक्मिणी संगें त्याचें लग्र । झाले, परंतु थोर विघ्र । विवाहसमयीं उद्भवलें ॥३॥ विदर्भ देशीं...