Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कृष्णाने दुर्योधनाला शेवटी सांगितलं होतं पराभवाच मुख्य कारण

कृष्णाने दुर्योधनाला शेवटी सांगितलं होतं पराभवाच मुख्य कारण
, शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (17:32 IST)
भीमने दुर्योधनची मांडी काढली होती आणि तो रक्ताने माखलेला रणभूमीवर पडलेला होता. काही वेळातच त्याचे प्राण निघणार होते पण तो सारखा श्रीकृष्णाकडे बघत आपले तीन बोट दाखवत काही सांगण्याचा प्रयत्न करत होता. वेदनेमुळे मुखातून आवाज येत नव्हती.
 
अशात श्रीकृष्ण त्याच्याजवळ गेले आणि म्हणू लागले की तुला काही सांगायचे आहेस का? तेव्हा त्याने म्हटले की महाभारताच्या युद्धात त्याकडून तीन चुका झाल्या आणि यामुळेच त्याचा पराभव झाला. जर त्या चुका आधीच कळल्या असत्या तर आज तो विजयी झाला असता.
 
श्रीकृष्णाने दुर्योधनाला त्या तीन चुकांबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की पहिल चूक म्हणजे मी स्वयं नारायणाची निवड करण्याऐवजी त्यांच्या सेनेची निवड केली. जर नारायण युद्धात कौरवांच्या पक्षात असते तर परिणाम अजूनच काही लागला असता.
 
दुसरी चूक म्हणजे आईद्वारे वारंवार बजावल्यानंतरही मी तिच्यासमोर झाडांच्या पानांची लंगोट घालून गेलो. जर नग्नावस्थेत गेलो असतो तर आज कोणताही योद्धा मला परास्त करु 
शकला नसता.
 
तिसरी आणि शेवटची चूक म्हणजे युद्धात सर्वात शेवटी जाण्याची चूक. जर मी आधीपासून युद्धाचा भाग झाला असतो तर अनेक गोष्टी समजल्या असता आणि माझ्या अनेक भावंड 
आणि मित्रांचा जीव वाचला असता.
 
श्रीकृष्णाने विनम्रतेने दुर्योधनाची सर्व गोष्ट ऐकली आणि नंतर त्याला सांगितले की 'तुझ्या पराभवाचं कारण तुझा अधर्मी व्यवहार आणि आपल्या कुलवधूचे वस्त्रहरण हे आहेत. तू 
स्वत: आपल्या कर्मांनी आपलं भाग्य लिहिलं.'.... 
 
श्रीकृष्णाच्या सांगण्याचं तात्पर्य असे होते की तू आपल्या या तीन चुकांमुळे नव्हे तर अधर्मी असल्यामुळे पराभूत झाला आहे. हे ऐकून दुर्योधनाला आपली खरी चूक कळली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देव्हार्यात समई का लावतात