Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संत निवृत्तीनाथांचे अभंग 211 ते 218

Webdunia
बुधवार, 15 जून 2022 (16:48 IST)
साधक बाधक न बाधी जनक । सर्व हरि एक आम्हां असे ॥ १ ॥
हरिविण नाहीं हरिविण नाहीं । हरि हेंचि पाही एकरूप ॥ २ ॥
हरि माझा जन हरि माझें धन । हरि हा निर्गुण सर्वांठायीं ॥ ३ ॥
निवृत्ति हरिलीळा दिनकाळ फळला । निमिशोनिमिषकळा हरिजाणे ॥ ४ ॥
 
त्रैलोक्य पावन जनीं जनार्दन । त्यामाजि परिपूर्ण आत्मज्योति ॥ १ ॥
नाहीं आम्हां काळ नाहीं आम्हा वेळ । अखंड सोज्वळ हरि दिसे ॥ १ ॥
ब्रह्म सनातन ब्रह्मीचे अंकुर । भक्तिपुरस्कार भूतें रया ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे दीन दुबळ मी एक । मनोमय चोख आम्हां गोड ॥ ४ ॥
 
प्रपंच टवाळ वृक्षाचें फळ । उपटिलें मूळ कल्पनेचें ॥ १ ॥
गेली ते वासना निमाली भावना । चुकलें बंधना यमपाश ॥ २ ॥
उपजत मूळ खुंटलें तें जाळ । मायेचें पडळ हरपलें ॥ ३ ॥
निवृत्तिस्वानंद नित्यता आनंद । जग हा गोविन्द आम्हां पुरे ॥ ४ ॥
 
कल्पना कोंडूनि मन हें मारिलें । जीवन चोरिले सत्रावीचें ॥ १ ॥
साजीव सोलीव निवृत्तिची ठेव । कृष्ण हाचि देव ह्रदयीं पूजी ॥ २ ॥
विलास विकृति नाहीपै आवाप्ति । साधनाची युक्ति हारपली ॥ ३ ॥
निवृत्ति कारण योगियांचे ह्रदयीं । सर्व हरि पाही दिसे आम्हां ॥ ४ ॥
 
नामरूप सोय नाहीं जया रूपा । तेंथिलये कृपा खेळों आम्हीं ॥ १ ॥
आम्हां हेंचि रूप अद्वैत स्वरूप । नाहीं तेथें किं लाभ कल्पनेचा ॥ २ ॥
ध्येय ध्यान खुंटे प्रपंच आटे । नाम हें वैकुंठा नेतु असे ॥ ३ ॥
निवृत्ति साधन वृत्तिच संपन्न । नाम हें जीवन अच्युताचें ॥ ४ ॥
 
कल्पितें कल्पिलें चित्त आकळिलें । तन्मय घोळिलें चैतन्याचें ॥ १ ॥
सांग माये कैसें कल्पिलें कायसे । सर्व ह्रषीकेश दिसे आम्हां ॥ २ ॥
निवृत्ति समरस सर्व ह्रषीकेश । ब्रह्मींचा समरस कल्पने माजी ॥ ३ ॥
 
नाहीं जनीं विजनीं विज्ञानीं । निर्गुण काहाणीं आम्हां घरीं ॥ १ ॥
सुलभ हरि दुर्लभ हरि । नांदे माजघरी आमचीये ॥ २ ॥
आनंदे सोहळा उन्मनीचि कळा । नामचि जिव्हाळा जिव्हे सदा ॥ ३ ॥
निवृत्ति देवीं धरिली निर्गुणीं । शांति हे संपूर्णी हरीप्रेमें ॥ ४ ॥
 
प्रपंचाची वस्ति व्यर्थ काह्या काज । आम्हा बोलतां लाज येतसये ॥ १ ॥
काय करूं हरि कैसा हा गवसे । चंद्र सूर्य अवसे एकसूत्र ॥ २ ॥
तैसें करूं मन निरंतर ध्यान । उन्मनि साधन आम्हां पुरे ॥ ३ ॥
निवृत्ति परिपाठ हरिनाम हेचि वाट । प्रपंच फुकट दिसे आम्हां ॥ ४ ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

वज्रकाया नमो वज्रकाया

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

आरती शुक्रवारची

Friday Remedies:शुक्रवारी केलेले हे छोटेसे काम तुमचे नशीब बदलेल आणि भरपूर पैसा मिळेल

दत्त स्तुती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments