Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सहस्र वर्षांपूर्वी ऋषींचे आविष्कार, गुपित जाणून व्हाल हैराण

सहस्र वर्षांपूर्वी ऋषींचे आविष्कार, गुपित जाणून व्हाल हैराण
, गुरूवार, 14 मे 2020 (15:16 IST)
भारत भूमी ही ऋषी मुनी आणि सिद्ध देवतांची भूमी असल्याचे म्हटलं जातं. अनेक अद्वितीय ज्ञान आणि चमत्कारांनी ही भूमी भरलेली असे. सनातन धर्म वेद मानत असे. प्राचीन ऋषी मुनींनी खूप जप, तपश्चर्या, कर्म, उपासना, संयम यांचा माध्यमाने वेदांमध्ये लपलेले गुप्त ज्ञान आणि विज्ञान शिकून सहस्र वर्षांपूर्वी निसर्गाशी निगडित अनेक गुपित उघडकीस आणून अनेक प्रयोग केले आणि त्यासाठी काही युक्त्या सांगितल्या. अश्या विलक्षण ज्ञानासमोर आधुनिक विज्ञान देखील हात जोडतो.
 
अनेक ऋषी मुनींनी वेदांच्या मंत्र शक्तीला आपल्या घोर तपश्चर्याने आणि निव्वळ योग साधनेमुळे असे असे पराक्रम केले आहेत की भले मोठे राजा महाराजा त्यांच्या बळापुढे नतमस्तक झाले आहे. अश्या या विलक्षण प्राचीन ऋषी मुनींनी केलेल्या प्रयोग आणि त्याचे गुपित जाणून घेऊया. ज्यांच्यापासून आपण अनभिज्ञ आहात.
 
1 महर्षी दधीची 
हे महान ऋषी आणि शिवभक्त होते. जगत कल्याण आणि त्यागची भावना ठेवून यांनी वृत्रासुराचा नाश करायला आपल्या अस्थींचे दान केल्याने ऋषी दधीची आदरणीय झाले. 
 
या संदर्भात एक आख्यायिका आहे की एकदा देवराज इंद्राच्या सभेमध्ये देवगुरु बृहस्पती आले. आपल्या मदमध्ये गुंग असलेले इंद्र बृहस्पतींच्या सन्मानार्थ उभे राहिले नाही. बृहस्पतींना हे सारे अपमानास्पद वाटले. ते ताबडतोब तेथून सर्व देवांना सोडून निघून गेले. हे बघून देवांना विश्वरूपाला आपले गुरु म्हणून स्वीकारावे लागले. परंतु हा विश्वरूप देवांपासून लपून छपून असुरांना सुद्धा यज्ञाचा एक भाग देत असे. 
 
देवराज इंद्रांना हे कळताच त्यांनी रागाच्या भरात त्याचे शिरच्छेद केले. विश्वरूप हे त्वष्टा ऋषींचे मुलं असे. त्यांनी चिडून इंद्राला मारण्यासाठी महाबळी वृत्रासुराची निर्मिती केली. वृत्रासुराला घाबरून इंद्राने सर्व देवांबरोबर पळ काढले. 
 
परमपिता ब्रह्मानी वृत्रासुराचा अंत करण्यासाठी लागणाऱ्या वज्राच्या निर्मितीसाठी इंद्र देवांना तपस्वी महर्षी दधीचींकडे त्यांचे हाड मागण्यासाठी पाठविले.  इंद्राने तिन्ही जगाच्या कल्याणासाठी त्यांचे हाडं दानात मागितले. महर्षी दधीचींनी जगत कल्याणासाठी आपले शरीर दान केले. महर्षी दधीचींच्या हाडाने बनलेल्या वज्राने वृत्रासुराचा अंत झाला. अश्या प्रकारे एका महान ऋषींच्या त्यागामुळे इंद्र देवाचे प्राण वाचले आणि तिन्ही लोक आनंदी झाले.
 
2 आचार्य कणाद
कणाद ऋषी हे आणू विज्ञानाचे निर्माते मानले गेले आहे. आधुनिक काळात आणू वैज्ञानिक जॉन डाल्टन यांच्या आधी देखील सहस्र वर्षांपूर्वी आचार्य कणाद यांनी या रहस्याचा उलघडा केला होता की पदार्थांचे आणू असतात.
 
3 भास्कराचार्य 
आधुनिक काळात न्यूटनला पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावण्याचे श्रेय दिले जाते. पण फारच कमी लोकांना हे ठाऊक असणार की गुरुत्वाकर्षणाच्या या रहस्याला न्यूटनच्या आधी अनेक शतकांपूर्वी भास्कराचार्यानी आपल्या ''सिद्धान्तशिरोमणी'' या ग्रंथात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीबद्दल असे लिहिले आहे की पृथ्वी एका वैशिष्ट्यपूर्ण शक्तीमुळे वर गेलेल्या वस्तूंना आपल्या कडे ओढते. या मुळे वरील वस्तू खाली पडते. 
 
4 आचार्य चरक
चरक संहिता सारख्या महत्त्वपूर्ण आयुर्वेदिक ग्रंथाची निर्मित करणारे आचार्य चरक आयुर्वेद तज्ज्ञ आणि त्वचेचे चिकित्सक सुद्धा मानले गेले आहे. आचार्य चरक यांनी शरीर विज्ञान, गर्भ विज्ञान आणि औषधी विज्ञानाबद्दल सखोल शोध लावला. आजच्या काळात सर्वात जास्त होणारे आजार मधुमेह, हृदय रोग आणि क्षय रोग सारख्या आजारांचे निदान आणि उपचारांची माहिती खूप आधी सांगितली गेली होती. 
 
5 भारद्वाज 
आधुनिक विज्ञानानुसार राईट बंधूंनी वायुयानाचा शोध लावला असे विदित असे. तर हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अनेक शतकांपूर्वी ऋषी भारद्वाज यांनी विमानशास्त्राच्या माध्यमाने विमानाला लुप्त करण्याचा विचारांपासून ते विमान एका ग्रह पासून ते दुसऱ्या ग्रहापर्यंत तसेच एका जगातून दुसऱ्या जगात नेण्याचे रहस्य उलगडले. अश्या प्रकारे ऋषी भारद्वाज हे वायुयानचे शोधकर्ता मानले जातात.
 
6 ऋषी कण्व 
वैदिक काळात ऋषींमध्ये ऋषी कण्व यांचे नाव आवर्जून घेतले जाते. त्यांच्या आश्रमातच राजा दुष्यन्तची बायको आणि त्यांचा मुलगा भरताचे संगोपन झाले असे. अशी आख्यायिका आहे की या भरताच्या नावावरच आपल्या देशाचे नाव झाले असे. सोमयज्ञची परंपरा ही देखील ऋषी कण्व यांचीच देणगी असे.
 
7 कपिल मुनी 
हे भगवान विष्णूंचे 5 वे अवतार मानले जातात. ह्यांचे वडील कर्दम ऋषी असे. ह्यांचा आईची देवाहुतीची इच्छा विष्णूंसारखा मुलगा आपल्यालाही हवा अशी होती. म्हणूनच त्यांच्या इच्छेचा मान राखून भगवान विष्णूंनी त्यांचा पोटी जन्म घेतला. कपिल मुनी हे 'सांख्य दर्शन' चे प्रवर्तक मानले जातात. ह्यांचा संदर्भात एक घटना अशी आहे- ज्या वेळी ह्यांचे वडील कर्दम संन्यास घेण्यासाठी अरण्यात जाऊ लागले त्यावेळी देवहूती एकटेपणाच्या जाणिवेपोटी दुखी झाली. अश्या वेळी ऋषी कर्दमानी देवाहुतीला आपल्या मुलांपासून ज्ञान मिळविण्याबद्दल सांगितले हेच ते ज्ञान सांख्य दर्शन होय.
 
त्याच प्रकारे पवित्र गंगेच्या पृथ्वीवर अवतरणाच्या मागे कपिल मुनींचा श्राप जगासाठी फायदेशीर ठरला. या मागे एक घटना आहे. भगवान श्रीरामाच्या पूर्वज सागर यांच्या यज्ञाचं घोडं इंद्रदेव चोरतात आणि कपिल मुनींच्या आश्रमाजवळ सोडतात. घोड्याचा शोध करीत असताना राजा सागरची 60 हजार मुलं कपिल मुनींच्या आश्रमात येतात आणि त्यांच्यावर चोरी करण्याचा आळ घेतात. संतापून कपिल मुनी राजा सागराच्या सर्वांच मुलांना नष्ट करतात. नंतरच्या काळात राजा सागराचे वंशज भगीरथाने तपश्चर्या करून स्वर्गातून गंगेला पृथ्वीवर आणतात आणि आपल्या पूर्वजांना शापपासून मुक्त करतात.
 
8 पतंजली 
आताच्या आधुनिक काळात जीवघेण्या आजारांमध्ये कर्करोगाचे निदान आणि उपचार संभव आहेत. परंतु बऱ्याच शतकांपूर्वी ऋषी पतंजलीने कर्क रोग प्रतिबंधक योगशास्त्रांची रचना केली होती आणि योगामुळे देखील कर्करोग बरा होऊ शकतो हे सांगितले.
 
9 शौनक 
वैदिक आचार्य आणि ऋषी शौनक यांनी गुरुशिष्य परंपरेला वाव दिले आणि संस्कार पसरविले. त्यांनाच 10 सहस्र शिष्य असलेले गुरुकुलाच्या कुलगुरू होण्याचा मान मिळाला आहे. शिष्यांचीही गणना अनेक आधुनिक विद्यापीठांच्या शिष्यांपेक्षा जास्त असे.
 
10 महर्षी सुश्रुत
हे शल्य चिकित्साचे पहिले चिकित्सक मानले जातात. शल्य क्रियेमध्ये हे दक्ष असे. यांनी लिहिलेल्या सुश्रुत संहिता ग्रंथात शस्त्रक्रिये विषयी अनेक महत्त्वपूर्ण ज्ञान विस्तृतपणे सांगण्यात आले आहे. या ग्रंथात सुई, सूरी, चिमट्यासारख्या तब्बल 125 हून जास्त शल्यचिकित्सेमध्ये वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांची माहिती दिली आहे. तसंच तब्बल 300 प्रकारांच्या शस्त्रक्रिया आणि त्यापूर्वीची केली जाणारी तयारीसाठी शस्त्र गरम पाण्यात उकळवणे या संदर्भात माहिती दिली असे. 
 
आधुनिक विज्ञानाने जवळपास 4 शतकांपूर्वी शस्त्रक्रियेचा शोध लावला होता. असे मानले जाते की महर्षी सुश्रुत मोतीबिंदू, मुतखडा, हाडांचे मोडणे, सारख्या वेदनांच्या उपचारासाठी शस्त्रक्रियेमध्ये तज्ज्ञ असे. इतकेच नव्हे तर त्यांनी त्वचेला बदलण्याची शस्त्रक्रिया देखील केली असे. 
 
11 वशिष्ठ 
गुरु वशिष्ठ हे राजा दशरथाचे कुलगुरू होय. राजा दशरथाच्या 4 ही मुलं राम, लक्ष्मण, भरत, शत्रुध्न यांनी शिक्षणाचे धडे गुरुदेव वशिष्ठ कडूनच घेतले होते. देवप्राणी आणि इच्छित वर देणारी कामधेनू गाय ऋषी वशिष्ठांकडेच असे. 
 
12 विश्वामित्र 
ऋषी होण्याच्या आधी विश्वामित्र हे क्षत्रिय असे. ऋषी वशिष्ठांकडून कामधेनू गाय मिळविण्यासाठी केलेल्या युद्धात पराभव मिळाल्यावर ते तपस्वी झाले. त्यांनी भगवान शंकरापासून अस्त्रविद्या मिळवली. या संदर्भात असे म्हटले जाते की आजच्या आधुनिक युगात प्रचलित प्रक्षेपास्त्र (मिसाइल) प्रणालीचा शोध ह्यांनीच लावला होता. विश्वामित्र हे ब्रह्मा गायत्री मंत्राचे ज्ञाता मानले जाते. ह्यांचे मेनके वर आसक्त होऊन तपश्चर्या खंडित होण्याचे प्रकरण सुद्धा प्रसिद्ध आहे. विश्वामित्रानेच शरीरासह त्रिशंकूला स्वर्गात पाठविण्याचे चमत्कार आपल्या तपोबलाने केले होते.
 
13 महर्षी अगस्त्य 
वैदिक मान्यतेनुसार मित्र आणि वरून देवतांचे दिव्य तेज यज्ञ कलशात एकत्र झाल्याने त्या कलशातून एक तेजस्वी महर्षी अगस्त्य उत्त्पन्न झाले. हे कठोर तपस्वी होते त्यांच्या तपोबलाबद्दल सांगण्यामागची एक आख्यायिका असे की एकदा समुद्री राक्षसांना त्रासाला कंटाळून सर्व देव महर्षी अगस्त्य यांच्याकडे मदतीसाठी जातात. तर देवांना राक्षसांच्या त्रासापासून सोडविण्यासाठी समुद्राचे सर्व पाणी पिऊन टाकतात, आणि सर्व राक्षसांचा नायनाट करतात. 
 
14 गर्ग मुनी
नक्षत्र आणि तारकांचे अन्वेषक गर्ग मुनी मानले जातात. त्यांनी श्रीकृष्ण आणि अर्जुन बद्दल नक्षत्र विज्ञानावर आधारित जे काही सांगितले ते तंतोतंत खरं निघाले. कौरव आणि पांडवांमधील युद्ध विनाशकारी होते. या मागील कारण असे की युद्धाच्या पहिल्या पक्षामध्ये तिथीचे लोप असल्याने 13 व्या दिवशी अवस असे. तसेच दुसऱ्या पक्षांमध्ये पण तिथीचा लोप झाल्याने पौर्णिमा 14 व्या दिवशी आली आणि त्या दिवशी चंद्रग्रहण होता. तिथी नक्षत्रांची ही स्थिती आणि त्याचा निकाल गर्ग मुनींनी सांगितले असे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय आपणही करता या 15 चुका