Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ICMRचा धक्कादायक रिपोर्ट, भारत कोरोनाच्या तिसऱ्या फेजमध्ये

ICMRचा धक्कादायक रिपोर्ट, भारत कोरोनाच्या तिसऱ्या फेजमध्ये
नवी दिल्ली , शनिवार, 11 एप्रिल 2020 (07:01 IST)
देशात कोरोनाचा संसर्ग चांगलाच वाढत आहे. मुंबई- पुण्यासारख्या शहरांमध्ये दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढतेच आहे. आतापर्यंत देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 6412वर पोहोचली आहे. तर राज्यात हा  आकडा 1364 वर पोहचला आहे. त्यामुळे 21 दिवस लॉकडाऊन असून देखील देशातील कोरोनाचा विळखा वाढतानाचं दिसत आहे.
 
त्यात आता इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने  भारत कोरोनाच्या बाबतीत फेज 3मध्ये गेला असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. ICMRने दिलेल्या या धक्कादायक माहितीमुळे देशातील धोका वाढला आहे. त्यामुळे आता नागरिकांनी अधिक सावध राहिले पाहिजे असे ICMRकडून सांगण्यात येत आहे. ICMR रिपोर्टनुसार 5911प्रकरणांपैकी केवळ २ पॉझिटिव्ह प्रकरणे अशी आहेत, ज्यातील एक रुग्ण कोरोना रूग्णाच्या थेट संपर्कात होता. दुसरे प्रकरण आंतरराष्ट्रीय प्रवासाशी संबंधित आहे. तर, 59 प्रकरणे अशी आहेत ज्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवास इतिहास नाही. म्हणजेच त्यांना देशभरात संसर्ग झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘ही’ वाहिनी लॉकडाउनच्या काळात ठरली ‘अव्वल’