Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, शंकराची आरती मराठी अर्थासह

Webdunia
रविवार, 12 जून 2022 (18:15 IST)
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
ब्रह्मांडातील ग्रहता-यांच्या, आकाशमालांच्या माळा तुझ्या गळ्यात लवथवत आहेत, डोलत, वळवळत आहेत!
 
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
समुद्रमंथनातून आलेले विष प्राशन करून तुझा कंठ काळवंडला आहे, तुझ्या तीन्ही नेत्रातून भयानक ज्वाळा बाहेर पडत आहेत!
 
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
अतीशय लावण्यवती, सुंदर अशी बाळा, कन्या, स्त्री तुझ्या मस्तकावर आहे (गंगा) 
 
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
तिथून अतीशय निर्मळ अशा गंगाजलाचा झरा वाहातो आहे!
 
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
हे शंकरा तुझा जयजयकार असो!
 
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
कापरासाख्या गो-या वर्णाच्या तुझी आम्ही आरती ओवाळतो!
 
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
हे कर्पुरगौर शंकरा, तु भोळा आहेस, विशाल नेत्र असलेला आहेस...
 
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
तुझी अर्धांगिनी पार्वती (शक्ती) ही जणु तुझे (शिवाचे) अर्धे अंगच आहे, तुझ्या गळ्यात फ़ुलांच्या माळा आहेत.
 
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
चिताभस्माची उधळण अंगभर केलेल्या तुझा कंठ विषप्राशनाने काळा-निळा (शिति) पडलेला आहे... 
 
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥
असा तु उमेवर अत्यंत प्रेम करणारा शोभत आहेस!
 
देवीं दैत्यीं सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं अवचित हलहल ते उठिलें ॥
देव आणि दैत्य यांनी जेंव्हा समुद्रमंथन केले तेंव्हा त्यातून अचानक हलाहल नामक विष बाहेर पडले...
 
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥
ते तू आसुरी वृत्ती धारण करून प्राशन केल्यानेच तुला नीळकंठ या नावाने प्रसिद्धी मिळाली...
 
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
वाघाचे कातडे ल्यालेल्या, नागबंध धारण केलेल्या, सुंदर रुप असलेल्या, मदनाचा संहार केलेल्या...
 
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
पाच मुखे असणा-या, मनमोहका, मुनीजनांना आनंद देणा-या...
 
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
शतकोटी नामांचा जो बीज मंत्र, तो "श्रीराम जय राम जय जय राम " हा मंत्र सतत वाचेने उच्चारणा-या...
 
रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥
आणि त्या रामनाम उच्चारणाने साक्षात रामरूप झालेल्या हे शंकरा. रघुकुलतिलका, तुला रामदासाचा अंत:करण पूर्वक नमस्कार असो!

संबंधित माहिती

Hanuman Jayanti शुभ योग घडत असल्यामुळे या 3 राशींना मिळणार आर्थिक लाभ !

श्री हनूमत् पञ्च चामरम्

हनुमान जयंती प्रसाद इमरती रेसिपी Imarti Recipe

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

आंजनेय द्वादश नाम स्तोत्रम्

'मोदींना ज्यावेळी शिवीगाळ केली जाते तेव्हा मोठा विजय होतो', फडणवीसांचा शरद पवारांवर जोरदार प्रहार

डीआरडीओने बनवले देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट

हिजाबवाली महिला भारताची पंतप्रधान बनावी, माझे स्वप्न आहे ओवेसी म्हणाले

अमित शहांची आज महाराष्ट्र आणि केरळमध्ये रॅली

अजित पवारांचा मुलगा पार्थला वाय प्लस सुरक्षा, आई सुनेत्रा पवार यांचा प्रचार

पुढील लेख
Show comments