Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शन्यष्टक

Webdunia
शनिवार, 4 डिसेंबर 2021 (08:46 IST)
नमो सूर्यसूता तुझी धन्य कीर्ती॥ न चाले मती वर्णिता स्तब्ध होती॥
लिलानाटकी अंत ना पार माया॥ अहा धन्य तुझी शनीदेवराया॥ १॥
आलि स्वारि ती गोचरिं दृष्टिठायीं॥ सखेसोयरे इच्छिती दुष्टताही ॥
धना हानि होई नसे काहिं माया॥ अहा धन्य०॥ २॥
जगीं मान्यते लौकिकिं द्वेश वाढे॥ कुडें पावडें येति अंगी लिगाडें॥
न मीटे कधीं यत्‍न जाताति वायां॥ अहा धन्य०॥ ३॥
नंसे कांही कोठें मना जो सुवारा॥ अंतरी येऊनी दु:खभारा॥
करूं इच्छितां गोष्ट जाते अपाया॥ अहा धन्य०॥ ४॥
कुटुंबात जी प्रिय होतीं जिवाचीं॥ तिहीं फिरलीं दुष्ट झालीं मनाचीं॥
नसे तोचि घेती मनामाजि थाया॥ अहा धन्य०॥ ५॥
नसे चैन कांही उदासी मनातेंअहा धन्य०॥ ४॥
तुझ्यावांचुनि कोण दे शांति त्याते ॥
नको क्लेश दावूं करीं पूर्ण छायाअहा धन्य०॥ ६॥
उठे चित्तिं चिंता जिवा रोग लागे ॥ झटे झोंबटें लागती पाठिमागें ॥
अहोरात्र तो त्रास वाटे जिवा या ॥अहा धन्य०॥ ७॥
अबाधीत लीला तुझी कोण वाणी ॥ चमत्कार तो दाविला शूळपाणी ॥
गिरीकंदरी लाविलासी फिराया ॥अहा धन्य०॥ ८॥
कथा ऎकिली सर्वही विक्रमाची ॥ आली त्यापरी संधि वाटे अतांची ।
महासंकटे येति कंठी भिडाया ॥अहा धन्य०॥ ९॥
फुटे छाति ते ऎकतां साडेसाती ॥ आतं ती आली माझिया कर्मपातीं ॥
कृपावंत तूं हांत दे गा तराया ॥अहा धन्य०॥ १० ॥
किती दु:ख सांगू नसे पार याला ॥ नसे थार कोठेम बसाया मनाला ॥
कृपाळूपणें पाहिं तूं होय वाली ॥ प्रितीनें पदीं रूंजि रखमाजिं घाली ॥ ११ ॥
इति शन्यष्टक समाप्त ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्री शनि अष्टकम् Shri Shani Ashtak

आरती सोमवारची

महादेव आरती संग्रह

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

सर्व पहा

नक्की वाचा

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

पुढील लेख
Show comments