rashifal-2026

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज

Webdunia
गुरूवार, 23 मार्च 2023 (09:39 IST)
इसवी सन 1856 ते 1878 19व्या शतकात. महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे दत्त संप्रदायातील थोर संत होऊन गेले. 

श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतर श्री दत्तात्रय हे तीसरे पूर्णावतार आहे. अशी आख्यायिका आहे. गाणगापुरातील श्री नृसिंह सरस्वती हेच श्री शैलमजवळील कर्दळीवनातून स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले. स्वामी समर्थांच्या मुखातून निघाले उद्गार नृसिंह सरस्वती अवतार असल्याचे समजते. 
 
स्वामी समर्थ आंध्रप्रदेशातील श्री शैलम क्षेत्राजवळी कर्दळीवनातून प्रकट झाले तेथून ते आसे तुहिमाचलास गेले.  
इ.स. 1856 च्या सुमारास स्वामी समर्थ मंगळवेढ्यातुन अक्कलकोट आले त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके 1778, अनल नाम संवत्सरे, रविवारी दि. 06 / 04 /1856 होय. 
 
श्री नृसिंह सरस्वती ह्यांनी गाणगापुरात पादुकांची स्थापना केल्यानंतर कर्दळीवनात अदृश्य झाले. 300 वर्ष कठोर तपश्चर्या करत असताना मुंग्यांनी त्यांचा वर वारूळ केले. एके दिवशी एक लाकूडतोड्या त्या वनात लाकूड तोडीत असतांना त्याचा हातून कुऱ्हाड निसटून त्या वारुळांवर पडली. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली. त्याच क्षणात दिव्य तेज पुंजातून त्या लाकूडतोड्यासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकटली ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ होय. 
 
आपल्याहातून एक महापुरुष जखमी झाल्याचे समजल्यावर त्याला दुःख व भय वाटू लागले. त्यांनी त्या लाकूडतोड्यास अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. नंतर ते कलकत्त्यास गेले. तेथे महाकालीचे दर्शन घेतले. उत्तरदिशेसतून भ्रमण करतं-करतं दक्षिणेस आले. 
 
इ.स. 1856 साली स्वामीने अक्कलकोट मध्ये अवतरले त्यामुळे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी अनेक मान्यवरांना मार्गर्शन दिले. इ.स. 1875 साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता त्या वेळी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्वामींच्या दर्शनास गेले होते. त्यावेळी त्यांनी सध्या लढायची वेळ नाही असे सांगितले. त्यांनी श्रीक्षेत्र त्रयम्बकेश्वर येथे शेगावच्या श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराजांना दीक्षा दिली. तत्पश्चात स्वामी पंढरपूर, मोहोळ भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर सोलापुरात आले. मंगळवेढे गावात राहून त्यांनी आपल्या लीलेने भक्तांना दुःख मुक्त केले. 
 
स्वामीने अनेकांना कामाला लावून इसवी सन 1878 मध्ये आपले अवतारकार्य संपविले असे म्हटले जाते. 
स्वामी समर्थ यांनी रविवार दि.30 एप्रिल 1878 रोजी (चैत्र वद्य त्रयोदशी, शके 1800, बहुधान्य नाम संवत्सर ) अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थानी माध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. स्वामींचे शिष्य चोळप्पा यांचा घरा जवळ यांची समाधी करण्यात आली. स्वामी समर्थ कर्दळीवनात परतले. 
 
प्रत्यक्षात स्वामी समर्थ आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत असून त्यांना मार्गदर्शित करतं आहे आणि अनंतकाळापर्यंत राहतील. "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" असे म्हणून स्वामी सतत आपल्या पाठीशी असून आपल्याला मार्ग दाखवीत आहे.
 
||अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांची जय ||  

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

घरात मैदा नाही का? गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत करंज्या बनवा

मंदिरात मूर्तीच्या पाठीमागे डोकं का टेकवू नये? जाणून घ्या त्यामागील 'धुंधकारी'ची कथा आणि आध्यात्मिक शास्त्र!

Masan Holi 2026 काशीची मसान होळी, मृत्यूचा उत्सव आणि अघोरी भक्तीचा सोहळा!

New flavors of Karanji; यंदाच्या होळीला पारंपारिक करंजीचे हे हटके फ्लेवर्स नक्की बनवून पाहा

शनिवारी हे 5 मंत्र जपा, शनीची कृपादृष्टी मिळवा

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments