अध्याय पंचवीसावा - श्लोक १ ते ५० श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ पूर्वीं क्षीरसिंधु मंथूनि ॥ चतुर्दश रत्नें काढिली निवडूनि ॥ तैसा रामकथार्णव शोधूनी ॥ रामविजय काढिला ॥१॥ दह्याचें पोटीं निघे नवनीत ॥ कीं स्वातीतोयापासाव मुक्त ॥ तैसा दशरथापासाव रघुनाथ ॥ महिमा अद्भुत तयाचा ॥२॥ कीं ज्ञानापासोनि शांति ॥...