Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमलकी एकादशी व्रत कथा

Webdunia
गुरूवार, 25 मार्च 2021 (12:31 IST)
राजा मान्धाता यांनी विचारल्यावर ऋषी वशिष्ठ यांनी आमलकी एकादशी व्रताचे माहात्म्य सांगितले. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या हे एकादशी व्रत केल्याने सर्व पाप नाहीसे होतात. हे व्रत केल्याने एक हजार गायी दान केल्याच्या सारखे पुण्य प्राप्त होतं. आमलकी एकादशीला आवळ्याचे महत्त्व आणि त्याच्या गुणांची पूजा करण्याचे विधान आहे. याची उत्पत्ती प्रभू विष्णुंच्या श्रीमुखाने झाल्याचे सांगितलं जातं. 
 
कथा
प्राचीन काळात वैदिक नावाच्या नगरात चैत्ररथ नावाचा चंद्रवंशी राजा राज्य करत होता. राजा उच्चकोटीचा विद्वान होता आणि अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचा होता. राजा प्रत्येक एकादशी व्रत विधीपूर्वक करत असे. त्याच्या राज्यातील सर्व लोक एकदशी व्रताचे पालन आणि पूजन करत होते. याच प्रकारे त्या राज्यात सर्व सुख-शांतीसह आनंदाने राहत होते. एकदा  फाल्गुन महिन्याच्या आमलकी एकादशी तिथीवर राजा आणि त्याच्या प्रजेने ज्यात बालक, तरुण आणि वृद्धजन सामील होते सर्वांनी एकादशी व्रत केले. नंतर आपल्या प्रजेसह राजाने मंदिरात जाऊन कळश स्थापित केले आणि धूप, दीप, नैवेद्य, पंचरत्न, छत्र इतरांनी पूजन केले. नंतर सर्व मंदिरात रात्री जागरण करु लागले. 
 
रात्री मंदिरात एक बहेलिया आला. तो आपल्या कुटुंबाचे पोषण जीव हिंसा अर्थात शिकार करुन करत असे. तेव्हा तो भुकेने अत्यंत व्याकुल होता. अन्नाची आस ठेवत तो मंदिराच्या एका कोपर्‍यात बसला. त्या जागी बसून तो प्रभू विष्णुंची कथा आणि एकादशीचे माहात्म्य ऐकत होता. याप्रकारे त्याने संपूर्ण रात्र जागरत करत घालवली. सकाळी सर्व लोक आपआपल्या घराकडे निघून गेले. तो बहेलिया देखील आपल्या घरी निघून गेला. 
 
काही काळानंतर बहेलियाचा मृत्यू झाला. त्याने जीव हिंसा केली होती म्हणून त्याला नरक भोगावं लागणार होतं परंतू त्या दिवशी आमलकी एकादशी व्रत आणि जागरणाच्या प्रभावामुळे त्याने राजा विदुरथ यांच्या घरी जन्म घेतला. त्याचं नाव वसुरथ असे ठेवले गेले. मोठ्या झाल्यावर तो चतुरंगिणी सेनासह व धन-धान्याने युक्त होऊन दहा सहस्त्र गावांचे संचालन करु लागला. त्याचा तेज सूर्यासमान, कांती चंद्रासमान, वीरता प्रभू विष्णुंच्या समान आणि क्षमा पृथ्वी समान होती. तो अत्यंत धार्मिक, सत्यवादी, कर्मवीर आणि विष्णुभक्त होता. 
 
एकदा राजा वसुरथ शिकार खेळण्यासाठी गेले होते. ते जंगलात रस्ता भरकटले आणि दिशा ज्ञान नसल्यामुळे त्या जंगलातील एका वृक्षाखाली झोपले. रात्री तेथे डाकू आले आणि राजाला एकटे झोपलेले बघून वसुरथच्या दिशेला आले. त्यांना राजाची ओळख पटून गेली. ते डाकू म्हणू लागले की या दुष्ट राजाने आमच्या आई-वडील, पुत्र-पौत्र व इतर बांधवांना मारले आहे आणि देशातून हाकलून दिले आहेत. आता याला मारुन आपल्या अपमानाचा सूड घ्यायला पाहिजे. ते डाकू राजावर प्रहार करु लागले. परंतू जेव्हा ही अस्त्रांनी राजावर प्रहार करायचे ते फुलांमध्ये परिवर्तित व्हायचे. 
 
आमलकी एकादशी व्रत का प्रभाव उसी समय राजा के शरीर से एक दिव्य देवी प्रकट हुई। वह देवी अत्यंत सुंदर थी तथा सुंदर वस्त्रों तथा आभूषणों से अलंकृत थी। उसकी आंखों से क्रोध की भीषण लपटें निकल रही थी। उस देवी ने कुछ ही क्षणों में उन सभी डाकुओं का नाश कर दिया। जब राजा नींद से जागा तो उसने ने वहां अनेक डाकुओं को मृत देखा तो वह आश्चर्य होकर सोचने लगा किसने इन्हें मारा? इस वन में कौन मेरा हितैषी रहता है? राजा वसुरथ ऐसा विचार कर ही रहा था कि तभी उसी समय वहां आकाशवाणी हुई 'हे राजन! यह सब आमलकी एकादशी के प्रभाव से हुआ है। इस संसार मे भगवान विष्णु के अतिरिक्त तेरी रक्षा कौन कर सकता है। इस आकाशवाणी को सुनने के पश्चात राजा ने भगवान विष्णु को स्मरण कर उन्हें प्रणाम किया, फिर अपने नगर को वापस आ गया और सुखपूर्वक राज्य करने लगा।

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्री दत्तगुरुशरणाष्टकम्- दत्तात्रेया तव शरणं

उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

मारुतीची निरंजनस्वामीकृत आरती

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments