Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कलियुगात घ्या संकटमोचन जय बजरंगबलीचे नाव

Webdunia
सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (23:50 IST)
प्राचीन काळापासून प्रत्येक युगामध्ये हनुमानची पूजा आणि भक्ती करणार्‍यांची मनोकामना जरूर पूर्ण होत आली आहे. शास्त्रीय आधारानुसार तीन युगे आहेत. आता कलियुग सुरू आहे. ग्रंथाच्या आधारानुसार कलियुगात देवाचे नाव घेतल्याने आपले पाप नष्ट होते. त्यासाठी पूजाअर्चा करण्याची गरज आहे.
 
ही पूजाअर्चा केल्याने देवी-देवता प्रसन्न होतात.
 
आपल्यावरील संकट दूर करण्यासाठी हनुमान मदत करतो. ज्याच्यावर हनुमंत प्रसन्न होतो, त्याच्यावरील संकट तत्काळ दूर होते आणि सुख तसेच संपत्ती प्राप्त होते. हनुमंताच्या अनेक विविध प्रकारात प्रतिमा उपलब्ध आहेत. शास्त्रीय आधारानुसार पूजेचे वेगळे महत्त्व सांगितले जाते. ज्या प्रकारच्या प्रतिमेचे पूजन केले जाते, तसे प्रत्येकाला फळ मिळते. म्हणजेच हनुमान प्रसन्न होतो. 
 
याला धन आणि संपत्तीबरोबर सुख पाहिजे त्यांनी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांची आराधना करणार्‍या हनुमानाची पूजा केली पाहिजे. वायुपुत्र भक्तीची प्रतिमा असलेल्या हनुमानाची पूजा केली असता हनुमान प्रसन्न होतो. तसेच श्रीराम, लक्ष्मण आणि सीता हेही प्रसन्न होतात. या देवतांच्या कृपेमुळे आपले संकट टळते, शिवाय सौभाग्य प्राप्त होते. 
 
हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्य कर्म झाल्यानंतर, शुभ वस्त्र परिधान करा. एका तांब्यात पाणी घेऊन हनुमानाच्या मंदिरात जा आणि त्या पाण्याने हनुमानाच्या मूर्तीला अभिषेक करा. पहिल्या दिवशी उडदाची एक डाळ हनुमानाच्या डोक्यावर ठेवून अकरा प्रदक्षिणा घाला, आणि मनातल्या मनात तुमची इच्छा हनुमानासमोर सांगा. नंतर उडदाची डाळ घरी घेऊन या व वेगळ्या ठिकाणी ठेवा. 
 
दुसर्‍या दिवशीपासून हीच प्रक्रिया करत राहा. ४१ व्या दिवशी ४१ उडदाचे दाणे ठेवून ४२ व्या दिवसापासून एक-एक डाळ कमी करत जा. ८१ दिवस हे अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर हनुमान स्वप्नात दर्शन देऊन तुमच्या इच्छापूर्तीचा आशीर्वाद तुम्हाला देतील.
 
आपल्या जीवनात समस्या येऊ नये असे वाटत असेल तर हनुमान मंत्राचा जप तुम्ही दर मंगळवारी देखील करू शकता. पुढील मंत्र करा. 
 
ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा.
 
सकाळी लवकर उठून नित्यकर्म करून स्वच्छ कपडे घालून आई-वडिलांना आणि गुरूला नमस्कार करून आसनावर बसा. पारद हनुमानाच्या असलेल्या फोटोसमोर बसून हा जप केल्याने विशेष फळाची प्राप्ती होण्यास मदत होते. जप करण्याकरिता लाल रंगाच्या माळेचा उपयोग करावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

बुधवारचा दिवस गणेशाला का समर्पित केला जातो, जाणून घ्या

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

मंगळवार : वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

Utpatti Ekadashi 2024: उत्पत्ति एकादशीला 3 प्रभावी उपाय करा, धन संकटपासून मुक्त व्हा !

आरती मंगळवारची

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments