Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वसंतानुभूती

Webdunia
बुधवार, 21 मार्च 2018 (12:21 IST)
शहराच्या मध्यवर्ती परिसरात असूनही माझं ऑफिस खूप छान ठिकाणी वसलेलं आहे. माझ्या ऑफिसला लागूनच शहरातील नामांकित मोठ्या बगिचांपैकी एक खूप पूर्वीपासूनची वाटिका आहे. आसपासच्या परिसरात आणि त्या वाटिकेत खूप उंचच उंच वृक्ष आहेत. जेवणाच्या सुटीत फेरफटका मारताना ऐन उन्हात देखील गर्द सावलीतून चालण्याचा सुखद अनुभव मिळतो. काटेसावरी, बॉटलब्रश, आकाशमोगरा ऊर्फ बुचाचे झाड अशी अनेक झाडे, वृक्ष ऑफिसच्या परिसरात आहेत. आजूबाजूला असणार्‍या वृक्षांची नावे सांगेन आणि आठवेन तितकं कमीच!
 
मागचा आठवडाभर मी सुट्टीवर होते आणि जवळपास आठवडाभरानंतर कामावर रूजू झाले. रजेवर जाण्यापूर्वी माझ्या कामाच्या टेबलासमोरील खिडकीत मला एक निष्पर्ण झालेली फांदी दिसली होती. आज जेव्हा माझ्या जागेवर गेले तेव्हा त्या फांदीला सुंदर गुलाबी रंगाची फुले डवरलेली दिसली. आठवडाभरातच ती फांदी सुंदर सुंदर फुलांनी बहरलेली, सावरीची फुले म्हणजेच शाल्मलीच फुललेली, वसंत बहरात आल्याची वर्दी घेऊन आलेली. इतकंच काय, थोडं नीट पाहिल्यावर त्या गुलाबी शाल्मलीच्या थोडं मागे दिसला बहरलेला नीलोहोर. गुलाबी आणि निळ्या-जांभळ्या अशा सुंदर रंगछटा अगदी मनमोहक. थोडंसं दूरवर नजर टाकल्यावर दिसला उंचच उंच अशोक-अगदी नवीन वसने लेऊन उभा आहे असं वाटावं. त्या वृक्षावर संपूर्ण नवीन पालवी, अगदी कोवळी-कोवळी, त्या पालवीचा रंग करडा, पोपटी अगदी चमचमणारा. ऐन दुपारच्या भर उन्हात त्या पालवीला अगदी लकाकते ठेवणारा आणि त्याच्यात बाजूला गुलोहर-पालवणारा अन्‌ बहराची वाट बघत झुलणारा.
 
वसंतपंची म्हणजे माघ शुद्ध पंचीपासूनच ऋतुराजाचे आगन होते. परंतु आजकाल जागतिक तापानवाढीचे अनेक परिणाम झालेत ऋतूंच्या आगमनावर. ऋतूंचं आगमन निर्धारित वेळेपेक्षा जरासे कमी-अधिक, उशिराने होतंय. पण यापासून अपवाद आहे पळस. पळस मात्र फुललेला असतो आपल्या अवतीभवती-वसंतपंचीपासूनच. ऋतुराज वसंत येणार असल्यादी वर्दी घेऊन पळस आधीच फुललेला. पळस वाट पाहात असतो. घमघमणार्‍या आम्रमोहोराची, कडूलिंबाच्या फुलोर्‍याची, रक्तकांती असणार्‍या पांगरा अन्‌ शंकासुराची. पळस अधीर असतो. निळा पोशाख लेऊन येणार्‍या नीलमोहोराची, गुलाबी रंगांच छटा उधळणार्‍या सावरी म्हणजेच शाल्मली, टाबुबिया ऊर्फ वसंतराणी. कॅशिया ऊर्फ गुलाबी बहावा, गुलबक्षी रंगाची बोगनवेल या सगळ्या फुलांना भेटाला. पळस आतुर झालेला असतो पिवळ्या रंगाचे घंटी फूल नावाप्रमाणेच घंटीच्या आकाराचे, पिवळा शंकासूर, यांना पहायला. पिवळा बहावा जेव्हा फुलतो तेव्हा तर ऋतूराजाच्या स्वागतासाठी सजवलेल्या झुंबरांसारखेच त्याचे रूप वाटते. प्रखर उन्हात या बहाव्याचे पिवळ्या धमक रंगाचे झुंबर खूप प्रसन्न वाटते. लाल आणि पिवळ्या रंगाची ही फुललेली फुलं आणि सजलेला आसमंत पाहिला की असा भास होतो. जणू चैत्रगौरीचे हळदीकुंकूच रस्त्याच्या दुतर्फा साजरे होत आहे. महाराष्ट्रराजचे राज्यपुष्प असणारे ताम्हण नावाचे फूल फुलते-वसंताच्या बहरातच! लालसर जांभळ्या रंगाचे हे फूल खूपच आकर्षक दिसते. पळस या रंगीबेरंगी फुलांची जशी वाट बघत असतो तशीच तो वाट पाहात असतो, ऋतुराजाच्या आगमनाची, सुरेल साद घालणार्‍या कोकीळ पक्ष्याची. वेगवेगळे राग आळवून सनई-चौघडे वाजत आहेत असेच वाटते. निष्पर्ण झालेला पळस पानांऐवजी फुलेच लेऊन बसलेला. त्याचा रंग देखील लालेलाल अगदी अग्नीच्या ज्वाळेसारखा प्रखर तर कधी पिवळा पिवळा धमक!
 
सहा ऋतूंचे निरनिराळे सोहळे, आगळ्या वेगळ्या ढंगात सजलेले, सृष्टीला न्यार्‍या रूपात सजवत आलेले. खरंतर, प्रत्येक ऋतू प्रत्येक वर्षी निराळा भासतो. आपापल्या अनुभवमूल्यानुसार जो तो ऋतू समृद्ध करतो आपल्याला. वेगळीच अनुभूती देणारा प्रत्येक क्षण, अन्‌ प्रत्येक ऋतू संपन्न करत असतो आपल्याला. नववर्षाचा साज घेऊन येणारा वसंत सृष्टीतील रंग-गंधाप्रमाणेच सजवत असतो, नित्यनेमाने आपल्या आयुष्याला..
 
मंजिरी सरदेशमुख 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Kaal Bhairav Ashtami 2024 भगवान कालभैरवाला प्रसन्न करण्याचे उपाय

आरती शुक्रवारची

Utpanna Ekadashi 2024: उत्पन्ना एकादशीला 3 प्रभावी उपाय करा, धन संकटपासून मुक्त व्हा !

Friday Remedies: शुक्रवारी या 4 गोष्टी करा, लक्ष्मीची विशेष कृपा मिळवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments